शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचा जीव भांड्यात, प्रकल्प मजीप्राकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 22:16 IST

महानगरात होऊ घातलेल्या मलनि:सारण प्रकल्पाची कार्यान्वयन यंत्रणा म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण राहणार असल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्दे८७ कोटींचा मलनि:सारण प्रकल्प : आर्थिक संकट टळले, भुयारी गटार योजनेची अंमलबजावणी होणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महानगरात होऊ घातलेल्या मलनि:सारण प्रकल्पाची कार्यान्वयन यंत्रणा म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण राहणार असल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. २ एप्रिल रोजी नगरविकास विभागाने शुद्धीपत्रक काढून चुकीची कबुली दिली व या कबुलीने महापालिकेचा जीव भांड्यात पडला. अल्प मनुष्यबळ व आर्थिक हलाखीत असलेल्या महापालिकेसमोर या प्रकल्पाच्या कार्यान्वयनावरून पेच उभा ठाकला होता. सदर प्रकल्पासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यान्वयन यंत्रणा म्हणून काम करणार असल्याने प्रशासनाला हायसे वाटले आहे.मुळ ६५.०४६० कोटी रूपये किंमतीच्या शहराच्या मलनि:सारण प्रकल्पास २६ मार्च २०१८ रोजी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. प्रकल्पाच्या घटकांमध्ये बदल झाल्याने किमतीत बदल झाला. त्याअनुषंगाने ८१.८७ या वाढीव किमतीला नव्याने मान्यता देण्यात आली. ८१.८७ कोटी रूपये किमतीच्या या प्रकल्पास ४०.९३५ कोटी रूपये केंद्र, २०.४६७५ कोटी राज्य शासन देईल, तर २०.४६ कोटी रूपये अमरावती महापालिकेचा स्वहिस्सा राहील, असे त्यात नमूद करण्यात आले. प्रकल्पाची रेंगाळलेली अवस्था पाहता राज्य सरकारने वाढीव किमतीला मान्यता दिल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. मात्र, त्याचवेळी याच शासन निर्णयात मलनि:सारण प्रकल्पाची अंमलबजावणी यंत्रणा ‘मनपा’ राहील, असे नमूद असल्याने प्रशासनाची घाबरगुंडी उडाली. यापूर्वीच्या मूळ प्रशासकीय मान्यतेनुसार १६.२६ कोटींचा महापालिकेला टाकावा लागणारा स्वहिस्सा शासनाने १४ व्या वित्त आयोगातील निधीतून परस्पर वळते करून घेतला असताना आता महापालिकेत या योजनेची अंमलबजावणी कशी करावी, महापालिकेचा बांधकाम विभाग आधीच अभियंत्यांविना पांगळा झाला आहे. तांत्रिक मनुष्यबळही नाही. अशा परिस्थितीत मागील २० वर्षांपासून रेंगाळलेला हा प्रकल्प महापालिकेकडे साकारायचा तरी कसा, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या शासन निर्णयात अमरावती महापालिका असले तरी मूळ प्रशासकीय मान्यतेवेळी मजीप्रा, असा उल्लेख होता. मागील अनेक वर्षांपासून मजीप्राच प्रकल्प कार्यान्वित करत होता. त्यासाठी मजीप्राने महापालिकेत अनेकदा बैठकी सुद्धा घेतल्या. प्रकल्प पूर्तीसाठी महापालिकेने मजीप्राला खडसावले पण असे असताना २६ मार्चच्या शासन निर्णयात मलनि:सारण प्रकल्पाचे कार्यान्वयन यंत्रणा अमरावती महापालिका राहील, हे ४.१ या परिच्छेदातील वाक्य प्रशासनाला घाम फोडणारे होते. मात्र, त्यानंतर सरकारी सुटी आल्याने प्रशासन नगरविकास विभागाशी पत्रव्यवहार करू शकले नाही. तथापि २६ मार्चच्या जीआरमधील मजीप्राऐवजी मनपा ही ढोबळ चूक काही पदाधिकाऱ्यांनी नगरविकासच्या लक्षात आणून दिली व त्याचा परिपाक म्हणून नगरविकासने शुद्धीपत्रक काढून मजीप्रावर शिक्कामोर्तब केले.अमरावती शहराच्या मलनि:सारण प्रकल्पासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यान्वयन यंत्रणा राहील. तसे शुद्धीपत्रक २ एप्रिलला काढण्यात आले आहे.- पां.जो. जाधव,सहसचिव, महाराष्ट्र जीवनया प्रकल्पासाठी महापालिका कार्यान्वयन यंत्रणा राहील, हे वाचून आश्चर्याचा धक्काच बसला. मनुष्यबळ व तांत्रिक साधने पाहता मजीप्राच त्यासाठी योग्य आहे. शुद्धीपत्रक काढून नगरविकास ‘देर आए-दुरूस्त आए!’- चेतन पवार, गटनेता, बसपा