शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पवारांकडून महापालिकेची प्रतिमा मलीन!

By admin | Updated: August 13, 2016 00:10 IST

आयुक्त तथा उपायुक्तांची पूर्वपरवानगी न घेता नगरसेवकांना पत्र देणे उपअभियंता रवींद्र पवार यांना महागात पडणार आहे.

कारणे दाखवा नोटीस : स्वअधिकारात नगरसेवकांना पत्र अमरावती : आयुक्त तथा उपायुक्तांची पूर्वपरवानगी न घेता नगरसेवकांना पत्र देणे उपअभियंता रवींद्र पवार यांना महागात पडणार आहे. ही कृती महानगरपालिकेची प्रतिमा मलीन करणारी असून आपल्या दोन वेतनवाढी का थांबविण्यात येऊ नये, अशी नोटीस पवारांना बजावण्यात आली. उपायुक्त विनायक औगड यांनी ८ आॅगस्टला ही नोटीस बजावली. पवारांना तीन दिवसात उत्तर देणे बंधनकारक आहे. महापालिकेत उपअभियंता या पदावर कार्यरत असलेल्या रवींद्र पवार यांनी ७ जुलैला वैयक्तिक शौचालय योजनेसंदर्भात नगरसेवकांना पत्र लिहिले. या योजनेअंतर्गत ११०११ लाभार्थ्यांचा डीपीआर मंजूर करण्यात आला होता. ही योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांकरिता आहे. मात्र अनेक लाभार्थी योजनेपासून वंचित असल्याने सर्व नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील वंचित लाभार्थ्यांची प्रकरणे कार्यकारी अभियंता २ या कार्यालयात सादर करावी. जेणेकरुन दलितवस्ती नागरिकांना शौचालयाचा लाभ देता येईल. असे त्या पत्रात नमूद करण्यात आले. या पत्रावर जावक क्रमांक आणि दिनांक सुद्धा नमूद नाही. मात्र कार्यकारी अभियंताकरिता म्हणून पवारांची स्वाक्षरी आहे. नगरसेवकांना कुठलेही पत्र देतांना उपायुक्त किंवा आयुक्तांची पूर्वपरवानगी आवश्यक असते. मात्र ती न घेता पवारांनी स्वअधिकारात पत्र देऊन पदाचा दुरुपयोग केला. असा ठपका उपायुक्तांनी ठेवला आहे. पवारांना तीन दिवसाच्या आत नोटीसचे उत्तर द्यायचे आहे. या मुदतीत खुलासा प्राप्त न झाल्यास एकतर्फी प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, अशी ताकीद त्यांना दिली आहे. (प्रतिनिधी)नोटीस कुणाला, पद कोणते ? ही नोटीस नेमकी कुणाला, याबाबत जीएडीकडून खातरजमा केली असता रवींद्र पवारांना नोटीस दिल्याचे सांगण्यात आले. उपायुक्तांच्या स्वाक्षरीने दिलेल्या या नोटीसमध्ये उपअभियंता असलेल्या रवींद्र पवारांच्या नावाखाली कार्यकारी अभियंता २ असे पद लिहिण्यात आले आहे. याशिवाय आपण कार्यकारी अभियंता २ या जबाबदारीच्या पदावर कार्यरत आहेत, असे नमूद आहे. महाराष्ट्र नागरी सेवा नियमाचे उल्लंघन नगरसेवकांना पत्र देतांना पवारांनी आयुक्त किंवा उपायुक्त यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक होते. मात्र पवार यांनी स्वअधिकारात पत्र देऊन पदाचा दुरुपयोग केला व महापालिकेची प्रतिमा मलीन केली. ही अत्यंत गंभीर स्वरुपाची बाब असून महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ मधील नियम ३ (१), (२), (३) चे उल्लंघन केल्याचा ठपका रवींद्र पवारांवर ठेवण्यात आला आहे.