शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचा ‘गजराज’ चालला, पोटे मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2022 05:00 IST

ऐन पावसाळ्यात अतिक्रमण हटाव माेहीम राबविल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मात्र, ही प्रशासकीय आणि निरंतर अशी कारवाई असल्याची कबुली महापालिका निर्मूलन पथकाचे प्रमुख अजय बंसेले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. सार्वजनिक स्थळ, रस्ते, नाली, ठेले हे विनापरवानगीने वा कोणतीही पूर्व सूचना न देता लावण्यात येत असतील, तर ते काढण्यासाठी नोटीस देण्याची गरज नाही. महापालिका अधिनियम २३१ नुसार ते हटविता येते, असे ते म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने आरंभलेल्या अतिक्रमण हटाव माेहिमेमुळे अतिक्रमणधारी व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. गत काही महिन्यांपासून थंड पडलेली महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम अचानक ‘ॲक्शन मोड’मध्ये आली. दरम्यान, अतिक्रमण हटविण्यासाठी राजकीय दबाव असल्याचा आरोप काही व्यापाऱ्यांनी केला आहे. शुक्रवारी राजकमल चौक ते गांधी चौक या मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आले. शनिवारी श्याम चौक परिसरातील दुकानांच्या काही भागावर पालिकेचा ‘गजराज’ चालला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. बापट चौक मार्गावरील अतिक्रमण काढले जात असताना व्यापाऱ्यांनी  विरोध केला असता महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. हे पथक काहीच ऐकत  नसल्याने काही व्यापाऱ्यांनी आमदार प्रवीण पोटे यांच्याकडे धाव घेतली. अतिक्रमण काढायचे असेल, तर त्यांना दोन दिवस अगोदर नोटिसीद्वारे कळवा आणि नंतरच बुलडोजर चालवा, अशी रोखठोक भूमिका घेत पोटे यांनी व्यापाऱ्यांना  दिलासा दिला. शिवाय ऐन पावसाळ्यात राबवित असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा व्यापाऱ्यांनी तीव्र निषेध नोंदविला.  कोणतीही पूर्वसूचना न देता अतिक्रमण कसे हटविले? अशी विचारणा आमदार पोटेंनी महापालिका पथकाला केली. दोन वर्षे कोरोना महामारीमध्ये व्यापाऱ्यांना फार मोठा फटका बसला. आता कुठं सर्व व्यवहार सुरळीत सुरू होत असताना महानगर पालिकेने अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली अतिरेकी कारवाई करू नये. व्यापारी वर्गाचे आर्थिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेत मोहीम राबवावी. त्याचप्रमाणे नियमबाह्य बांधकाम असल्यास व्यापाऱ्यांना दोन दिवसाची नोटीस देऊन कार्यवाही केल्यास ते आपले साहित्य, अतिक्रमण काढून घेतील, असे आमदार प्रवीण पोटे म्हणाले. 

- तर नोटीस देण्याची गरज नाही : अजय बंसेले ऐन पावसाळ्यात अतिक्रमण हटाव माेहीम राबविल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मात्र, ही प्रशासकीय आणि निरंतर अशी कारवाई असल्याची कबुली महापालिका निर्मूलन पथकाचे प्रमुख अजय बंसेले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. सार्वजनिक स्थळ, रस्ते, नाली, ठेले हे विनापरवानगीने वा कोणतीही पूर्व सूचना न देता लावण्यात येत असतील, तर ते काढण्यासाठी नोटीस देण्याची गरज नाही. महापालिका अधिनियम २३१ नुसार ते हटविता येते, असे ते म्हणाले.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण