उपायुक्तांचे आदेश : प्रहार संघटनेच्या ठिय्या आंदोलनाला यशअमरावती : महापालिका क्षेत्रात खाजगी कंपन्या विना परवानगीने केबल टाकण्याचे काम करीत असल्याची तक्रार घेऊन प्रहार संघटनेने मंगळवारी महापालिका उपायुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनाचे फलित झाले असून शहरातील विना परवानगीने टाकण्यात येणारे केबल जप्त करण्याचे आदेश महापालिका उपायुक्तांनी दिले आहेत. शहरातील मोबाईल सेवा अत्याधुनिक बनविण्यासाठी विविध कंपन्या फोर जी केबल टाकत आहेत. शहरात अनेक मार्गांवर केबल टाकण्याचे कार्यही सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी विनापरवानगीने केबल टाकण्याचे कार्य सुरु आहे. या प्रकाराबद्दल महापालिकेच्या आमसभेत नगरसेवकांनी रोष व्यक्त केला होता. मात्र, तरीसुध्दा खासगी कंपन्यांची कामे सुरुच आहेत. विना परवानगीने ज्या कंपन्यानी केबल टाकले असेल अशा कंपन्याचे केबल जप्तीचे आदेश देण्यात आले आहे. लवकरच जप्तीची कारवाई सुरु होईल. - चंदन पाटील,महापालिका उपायुक्त.
महापालिका करणार विना परवानगीचे केबल जप्त
By admin | Updated: April 8, 2015 00:20 IST