शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका कर्मचारी ‘सैराट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 22:55 IST

महापालिका आयुक्त हेमंत पवार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत अनेक कर्मचारी त्यांच्या मनात येईल तसे वागू लागल्याने ‘एमडी’ अस्तित्वशून्य आणि कर्मचारी सैराट’ अशी परिस्थिती ओढवली आहे.

ठळक मुद्दे‘एमडी’ अस्तित्वशून्य : आयुक्तांना जुमानेनात

आॅनलाईन लोकमतअमरावती : महापालिका आयुक्त हेमंत पवार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत अनेक कर्मचारी त्यांच्या मनात येईल तसे वागू लागल्याने ‘एमडी’ अस्तित्वशून्य आणि कर्मचारी सैराट’ अशी परिस्थिती ओढवली आहे.महापालिका आस्थापनेवर असलेल्या अधिकारी-कर्मचाºयांना आयुक्तांकडून प्रशासकीय शिस्तीचे बाळकडू दिले जात असले तरी त्यांचे ‘डोज’ कुणाच्याही पचनी पडत नसल्याची वस्तुस्थिती आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय वचक नसल्याने किंवा आस्थापना सांभाळणारे ‘एमडी’ अस्तित्वहीन झाल्याने कर्मचारी सैराट झाल्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे.सामान्य प्रशासन विभागाची धुरा सांभाळत असताना कुणीही दुखावणार नाही, या भूमिकेतून काम केले जात असल्याने प्रशासकीय कारवाईस अडसर निर्माण झाला आहे. कुणाच्या तरी सांगण्यावरून कर्मचाºयांच्या बदल्या करायच्या, जीएडीकडून आदेश करवून घ्यावेत, मात्र ते बदलीप्राप्त कर्मचारी रूजू वा कार्यमुक्त झाले की नाही, ही जबाबदारी मात्र झटकायची, असा नवा पायंडा ‘एमडी’ने पाडला आहे.एखादी नियमबाह्य बाब लक्षात आणून दिली तरी त्याला अटकाव घालण्याऐवजी संबंधितास अभय देण्याची मानसिकता वाढल्याने कर्मचारी मनमौजी झाले आहेत.‘प्रामाणिकपणाची हाकाटी पिटवून मर्जीतील कर्मचाऱ्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करायचे, मात्र त्याचवेळी बदलीतील अनियमिततेवर संबंधित विभागप्रमुखांवर खापर फोडायचे, अशी भूमिका या ‘एमडी’ अधिकाºयाने घेतल्याने जीएडी वा आस्थापनेचे तीन-तेरा झाले आहेत. निलंबितांच्या खातेचौकशी प्रलंबित ठेवल्या जात असून मर्जीतील कर्मचारी दुखावू नयेत, या भूमिकेतून महापालिकेचे कामकाज चालले आहे. आस्थापना सांभाळणाºया ‘एमडी’कडून अनेक घोटाळे दडपण्याचा प्रयत्न होत असून त्यात आर्थिक व्यवहार नसला तरी सर्वांशी गोड राहण्याची प्रवृत्ती दिसून येत आहे. आयुक्तांनी पॉवर डेलिगेट केल्यानंतरही भ्रष्टाचाºयांवर थेट कारवाई न करता ‘गोलमाल’ भूमिका घेतली जात आहे. या ‘एमडी’वर कामाचा अतिरिक्त बोझा वाढला आहे त्यामुळे त्यांची कार्यप्रणाली ‘एक ना धड, भाराभर चिंध्या’, अशी झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्येही प्रचंड प्रशासकीय अनियमितता होत असून दोन महिन्यांनंतरही रूजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कुठलीही कारवाई न झाल्याने त्यांनीच अभय दिल्याचा आरोप होत आहे. कोण कर्मचारी रूजू झाला, याची खबरबात ठेवणे आयुक्तांची कार्यकक्षा नाही. मात्र, बदली होऊनही कर्मचारी जात नसतील तर आयुक्तांनाच दोषी ठरविले जाते. प्रत्यक्षात ती सर्व जबाबदारी एमडीची असताना ते घोंगडे झटकत असल्याने आयुक्तांचाही भ्रमनिरास झाला आहे. बदली, चौकशी अहवाल, खाते चौकशी, प्रशासकीय कारवाईला लालफितशाहीचे ग्रहण लागले आहे.‘ते’ कार्यमुक्त केव्हा?बदलीला वर्षे उलटूनही कर्मचारी बदलीस्थळी रूजू होत नसेल तर तो थेट आयुक्तांचाच अपमान आहे. आयुक्तांच्या स्वाक्षरीने निघालेल्या बदली आदेशाची अंमलबजावणी झाली किंवा कसे? हे पाहण्याची जबाबदारी ‘जीएडी’ची आहे. मात्र ‘अ‍ॅडजेस्टमेंट’मध्ये अडकलेल्या जीएडीकडून आयुक्तांची दिशाभूल करण्यात येत असून बदलीप्राप्त कर्मचाऱ्यांची कार्यमुक्ती केव्हा? असा प्रामाणिक कर्मचाºयांचा सवाल आहे.