शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत काँग्रेसची आघाडी राष्ट्रवादीसोबतच

By admin | Updated: September 8, 2014 00:55 IST

महापालिकेत यापूर्वी सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी करण्यात आली आहे. हीच आघाडी मंगळवारी महापौर,

अमरावती : महापालिकेत यापूर्वी सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी करण्यात आली आहे. हीच आघाडी मंगळवारी महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत राहील, असा दावा राष्ट्रवादीचे गटनेता सुनील काळे यांनी रविवारी पत्रपरिषदेत केला. आघाडी करण्याच्या अनुषंगाने वरिष्ठ पातळीवर घडामोडी सुरुअसल्याची माहिती त्यांनी दिली.राष्ट्रवादी काँग्रेस गटनेतेपदाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगनादेश दिल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रपरिषदेत महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणूकविषयी काळे यांनी पक्षाची भूमिका विशद केली. काळे यांच्या माहितीनुसार, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या गटनेतेपदी अविनाश मार्डीकर यांना कायम ठेवल्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने ५ सप्टेंबर रोजी स्थगनादेश दिला. त्यामुळे महापालिकेत राजकीय परिस्थिती बदलली असून आता राष्ट्रवादीचे गटनेता म्हणून सुनील काळे यांनाच महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत सदस्यांना ‘व्हीप’ देण्याचा अधिकार असल्याचा दावा त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने कोणताही पक्ष हा आघाडी किंवा फ्रंटमध्ये विलीन होऊ शकत नाही, या मुख्य मुद्यासाठी याचिकेवर भर देण्यात आला होता. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने खंडपीठाच्या निर्णयावर स्थगनादेश देत सुनील काळे यांना पुढील निर्णयापर्यंत अधिकार बहाल करण्याचे आदेशात म्हटले आहे. एवढेच नव्हे, तर राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत सदस्यांनी सुनील काळे यांनी काढलेल्या पक्षदेशाचे पालन करावे, असे सुचविले आहे. सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रवादी पक्षाने माझ्या नावावर गटनेता म्हणून शिक्कामोर्तब केल्याने सर्व वाद संपुष्टात आल्याचे काळे यांनी सांगितले. महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादीकडे संख्याबळ असून ते मंगळवारी दिसून येईल, असा दावा त्यांनी केला. त्यानुसार संख्याबळाच्या जुळवणुकीसाठी काही पक्षांशी बोलणी सुरु असून निश्चितपणे राष्ट्रवादीचाच महापौर बनेल, असा विश्वास सुनील काळे यांनी यावेळी व्यक्त केला. सध्या राष्ट्रवादीत १० सदस्यांचे संख्याबळ असून ही संख्या दोन दिवसांत १८ च्या वर पोहचेल. ‘व्हीप’ न पाळणाऱ्यांविरुद्ध अपात्रतेची कारवाई केली जाईल, असे काळे म्हणाले. पत्रपरिषदेला सुनील वऱ्हाडे, नितीन हिवसे, प्रवीण मेश्राम, गणेश खारकर, सपना ठाकूर, जयश्री मोरय्या, आशा निंदाने, श्रेयस वैष्णव उपस्थित होते.