शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका इमारतीचा जिणा अतिक्रमणात !

By admin | Updated: August 13, 2016 00:07 IST

महापालिकेने २० ते २५ वर्षांपूर्वी इमारत बांधली. पण, या इमारतीत समोरील भागाकडून चढण्यासाठी रस्त्याचे नियोजन न केल्यामुळे ...

फुटपाथ गडप : यंत्रणेचे दुर्लक्ष, पादचाऱ्यांना होतोय त्रास अमरावती : महापालिकेने २० ते २५ वर्षांपूर्वी इमारत बांधली. पण, या इमारतीत समोरील भागाकडून चढण्यासाठी रस्त्याचे नियोजन न केल्यामुळे मागील अनेक वर्षांपासून येथे लोखंडी जिणा टाकण्यात आला असून हा जिणा नियमबाह्य आहे. यामुळे फुटपाथ गडप झाला आहे. याकडे महापालिका यंत्रणेने दुर्लक्ष चालविले आहे.राजकमलपासून बडनेराकडे जाणारा मार्ग हा जुना राज्य महामार्ग असून तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली येतो. या रस्त्यालगतच महापलिकेची इमारत असून राजलक्ष्मी टॉकीजसमोरील महापालिकेच्या प्रवेशव्दाराजवळील इमारतीत वरच्या मजल्यावर जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे येथे अनधिकृतपणे दोन लोखंडी जिणा तयार करण्यात आले आहेत. जिण्याखाली लोकांना चालण्यासाठीच फुटपाथ आहेत. पण या जिण्यामुळे फुटपाथवरून नागरिकांना चालता येत नाही. संपूर्ण शहराला महापालिका शिस्त लावते. शहरातील अनेक मोठ्या व्यावसायिकांनी केलेले अनाधिकृत बांधकाम व अतिक्रमण महापालिकेने पाडले आहे. पण, हा अतिक्रमण केलेला अनधिकृत जिणा केव्हा काढणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. महापालिकेने बीओटी तत्वावर ही ईमारत बांधून यातील दुकाने, गाळे अनेक वर्षांसाठी व्यावसायिकांना भाड्याने दिले आहेत. परंतु वरच्या मजल्यावर चढण्यासाठी कुठलीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. हा प्रकार महापालिकेचे अधिकारी मागील अनेक वर्षांपासून उघड्या डोळ्यांनी पाहतात. पण, हा नियमबाह्य जिणा कुणीही काढला नाही. आयुक्त हेमंत पवार हा जिणा काढणार का, असा प्रश्न अमरावतीचे नागरिक विचारत आहेत. (प्रतिनिधी)अतिक्रमण करून व्यवसायिकांनी जिणा बांधला असेल तर मी त्याची तपासणी करतो. अतिक्रमणात असल्यास संबंधित यंत्रणेला ते काढण्यासंदर्भात आदेश देतो. - सु.प.कांबळे, सहसंचालक,नगररचना विभाग, महापालिका