अमरावती : महापालिकेत सध्या बजेटची धूम सुरू आहे. सन २०२०-२१ करिता नियोजित बजेट प्रशासनाद्वारा स्थायी समितीकडे सीलबंद लखोटा पाठविण्यात आलेला आहे. समितीच्या येत्या बैठकीत आयुक्त संजय निपाणे यांच्योद्वारा सादर होईल. त्यानंतर स्थायी समितीच्या सभापती राधा कुरील महासभेत सादर करणार आहेत.गतवर्षीच्या बजेटची प्रतिरुप असण्याची चर्चा सध्या महापालिका वर्तुळात होत आहे. त्यामुळे महापालिकेचा मंदावलेला गाडा गतिमान करण्यासाठी आयुक्तांद्वारा काय उपाययोजना केल्या जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. साधारणपणे ८०० कोटींवर हे बजेट राहण्याची शक्यता आहे. यंदाच्या बजेटमध्ये मालमत्ता कर वसुलीच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. स्थायी समिती यामध्ये काय बदल सुचविते, त्या नव्या बदलासह सभापती राधा कुरील महासभेत अर्थसंकल्प सादर करतील.आयुक्तांनी महापालिका प्रशासनाच्या सर्व विभागप्रमुखांशी चर्चा केल्यानंतर लेखा विभागाच्या सहाय्याने हा अर्थसंकल्प तयार केलेला आहे.महापालिकेच्या उत्पन्नवाढीचा विषय आयुक्तांनी गांभीर्याने घेतला असल्याने महसुली उत्पन्नात काही प्रमाणात वाढ होणार आहे. महापालिकेची एकूण आर्थिक स्थिती लक्षात घेता, कर वसुली व बाजार परवाना विभागाकडे विशेष जोर राहणार आहे. शासनाद्वारा मागच्या महिन्यात जारी झालेल्या राजपत्रानुसार व्यापार संकुलाचे दरवाढीचे अधिकार आता समितीला प्रदान करण्यात आल्यामुळे बाजार परवाना विभागाचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.पहिल्यांदा महिला सभापतींद्वारा महासभेत 'बजेट'महापालिकेच्या स्थापनेनंतर यंदा प्रथमच महिलेला स्थायी समितीच्या २८ व्या सभापतीचा मान मिळाला. त्यामुळे स्थायी समितीत आयुक्तांनी सादर केल्यानंतर त्यामध्ये मंथन होऊन फेरबदलासह बजेट महासभेत सादर केल्या जाईल.यावेळचे बजेट पहिल्यांदा महिला सभापती सादर करणार आहेत. या बजेटमध्ये महापालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेता स्थायीत काय बदल सुचवितात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिका प्रशासनाचे बजेट स्थायीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 05:00 IST
गतवर्षीच्या बजेटची प्रतिरुप असण्याची चर्चा सध्या महापालिका वर्तुळात होत आहे. त्यामुळे महापालिकेचा मंदावलेला गाडा गतिमान करण्यासाठी आयुक्तांद्वारा काय उपाययोजना केल्या जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. साधारणपणे ८०० कोटींवर हे बजेट राहण्याची शक्यता आहे. यंदाच्या बजेटमध्ये मालमत्ता कर वसुलीच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. स्थायी समिती यामध्ये काय बदल सुचविते, त्या नव्या बदलासह सभापती राधा कुरील महासभेत अर्थसंकल्प सादर करतील.
महापालिका प्रशासनाचे बजेट स्थायीकडे
ठळक मुद्देआयुक्त करणार सादर : समितीच्या येत्या बैठकीत होणार मंथन