शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

चिखलदऱ्यात मुसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 22:34 IST

तालुक्यातील सेमाडोह, घटांग, काटकुंभ, जारिदा परिसरात मंगळवारी सकाळी ९ वाजता वादळासह मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. परिणामी वातावरणात पूर्णत: गारवा पसरला.

ठळक मुद्देपारा घसरला : नदी, नाले वाहू लागले, मेळघाट बर्फाच्छादित, गहू, हरभऱ्याचे नुकसान

आॅनलाईन लोकमतचिखलदरा : तालुक्यातील सेमाडोह, घटांग, काटकुंभ, जारिदा परिसरात मंगळवारी सकाळी ९ वाजता वादळासह मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. परिणामी वातावरणात पूर्णत: गारवा पसरला. परिसरातील नदी, नाले खळखळून वाहू लागले. गारपिटीने परिसर बर्फाच्छदित झाला. आदिवासींच्या शेतातील गहू आणि हरभऱ्याचे प्रचंड नुकसान झाले. विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा तालुक्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सेमाडोह, अतिदुर्गम हतरु खडीमल, दहेंद्री काटकुंभ, चुरणी, माखला, घटांग परिसरात मंगळवारी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत तब्बल दोन तास मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोबतच गारपीट झाल्याने संपूर्ण परिसर पांढरा शुभ्र झाला होता. वादळवाऱ्यासह पावसाला सुरुवात झाल्याने परतवाडा-खंडवा महामार्गावरील घटांग, सेमाडोह, हरिसालपर्यंत रस्त्यावर झाडांचा पालापाचोळा गारांचा ढीग, काळोख व पाऊस कोसळल्याने महामार्ग ठप्प पडला होता.मंगळवारी महाशिवारात्री असल्याने मध्यप्रदेशच्या ओंकारेश्वर येथे जाणाऱ्या शिवभक्तांसह पर्यटकांना रस्त्यावरच काही वेळ थांबावे लागले. पावसाने मुसळधार हजेरी लावल्याने नदी, नाले वाहू लागल्याचे चित्र दिसून आले. अनेक ठिकाणी निंबूच्या आकाराच्या गारा पडल्यामुळे घरावरील कवेलू फुटले. त्यामुळे घराला गळती लागली आहे.अमरावतीतही वादळी पावसासह गारपीटअमरावती : जिल्ह्याला वादळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसल्याने शेतकरी हवालदिल झाले. सोमवारी शहरातील काही भागात पावसासह बोराच्या आकाराच्या गारा पडल्याने नागरिकांची भंबेरी उडाली. १४ फेब्रुवारीपर्यंत हीच स्थित राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांंनी व्यक्त केला. शहरालगच्या बडनेरा, भानखेडा, अकोली परिसरात गाराचा वर्षाव झाल्यामुळे नागरिकांची चांगलीच ताराबंळ उडाली होती. वलगाव ते बडनेरा रींग रोड स्थित पकंज सुने यांच्या शेतशिवारात गारांचा खच पडला असून शहरातील काही भागात व शहरालगतच्या शेतशिवारांमध्ये गारा पडल्या.परिसरातील विलोभनीय दृश्यचिखलदरा, सेमाडोह या पर्यटन स्थळावर गारवा पसरला असून तापमानात घट झाली आहे. अचानक नदी नाले, वाहू लागल्याने विलोभनीय दृश्य पर्यटकांना मोहित करणारे ठरले आहे. गारांचा थर बाजूला करण्यासाठी आदिवासींना तो पावड्याने सरकावा लागला. तर मेळघाटात दाट धुके, काळोख अद्भूत नजाºयाचा आनंद पर्यटक घेताना दिसले.सेमाडोह, हातरु, काटकुंभ परिसरात मुसळधार, गारपीट झाली. घरांचे छत, गहू हरभरा पिकांचे नुकसान झाले. त्यांची माहिती घेतली जात आहे. अप्रिय घटना कुठेच घडलेली नाही. - प्रदीप पवार, तहसीलदार