बिलाचे रिडिंग घेण्याकरिता डिव्हीजननुसार एजन्सी नेमण्यात आल्या आहेत. एजन्सीव्दारा वीज कर्मचारी ग्राहकाच्या घरी मीटरचे रेडींग घेण्याकरिता विलंब करतात तसेच ग्राहकांना बिलेसुद्धा उशिरा मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. आता मोबाईल ॲपव्दारे रिडींग घेतले जाते. त्याला जीपीएस ट्रॅकींग असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
महावितरणचे ग्राहक
घरगुती-
कृषी-
औद्योगिक-
१०० युनिट
घरगुती ग्राहकाला पहिल्या १०० युनिटकरिता ३ रुपये ४४ पैसे प्रतियुनिटचा दर लागतो.
१०१ ते ३०० युनिट
घरगुती ग्राहकाला १०१ ते ३०० युनिट पर्यंत प्रतियुनिट ७ रुपये ३४ पैसे दर लागतो.
३०१ ते ५०० युनिट
घरगुती ग्राहकांकरिता ३०१ पासून ५०० युनिटपर्यंत वीज वापरल्यास प्रतियुनिट १० रुपये ३६ पैसे एवढा दर लागतो. ५०१ ते १००० हजार युनिटपर्यंत प्रतियुनिट ११ रुपये ८२ पैसे प्रतियुनिट दर लागतो. मात्र, हजार युनिटच्यावर कितीही युनिट जाळले तरी प्रतियुनिट ११ रुपये ८२ पैसे दर लागत असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.
ही घ्या उदाहरणे
एक बँक अधिकाऱ्याच्या घरी मीटर रिडींग घेण्यास विलंब केल्यामुळे त्यांना दुसऱ्या महिन्यात बिल दुप्पट देण्यात आले. सरासरी खर्च केलेले युनिट कमी असून, रिडिंग घेण्यास विलंब केल्यामुळे त्यांना ३.४४ प्रतियुनिटचा दर न लावता. ७.३४ पैसे युनिटचा दर लावल्याने त्यांना काही पैसे अतिरिक्त पे करावे लागले. अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता काहीही फायदा झाला नाही. उशिरा चुकीचे रिडींग घेतल्याचा ग्राहकाचा आक्षेप होता.
कोट
अधीक्षक अभियंता यांचा कोट आहे.