शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचा मानव संसाधन विभाग झाला हायटेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:15 IST

अमरावती : वीज ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकसेवा देणाऱ्या महावितरणने मानव संसाधन विभागाचे कामकाज सॅप-ईआरपी प्रणालीने सुरू केले आहे. ...

अमरावती : वीज ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकसेवा देणाऱ्या महावितरणने मानव संसाधन विभागाचे कामकाज सॅप-ईआरपी प्रणालीने सुरू केले आहे. सुमारे ५४ हजार कर्मचाऱ्यांसाठी कार्यरत सर्वच २२५ कार्यालयांमधील मानव संसाधन विभागाचे कामकाज या प्रणालीमुळे ऑनलाईन, जलद, अचूक व मानवी हस्तक्षेपरहित झाले आहे.

यापूर्वी महावितरणच्या मानव संसाधन विभागामध्ये मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली (एचआरएमएस) द्वारे कामकाज सुरू करण्यात आले होते. यामध्येही मानव संसाधन विभागाचे कामकाज वेगवान झाले. त्याहीपेक्षा अधिक वेगवान व बिनचूक असलेली सॅप-ईआरपी प्रणाली लागू करण्याचा महावितरण व्यवस्थापनाने निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात ही प्रणाली लेखा विभागासाठी सुरू करण्यात आली. त्यानंतर मानव संसाधन विभागासाठी सॅप-ईआरपी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. महावितरणची ही प्रणाली लागू करण्यापूर्वी महावितरणचे विविध नियम तसेच नियमावलीसोबतच मानव संसाधन विभागाशी निगडित संस्था व्यवस्थापन, वैयक्तिक प्रशासन, नूतनीकरण, वेळव्यवस्थापन, पे-रोल, उच्चवेतनश्रेणी लाभ, प्रशिक्षण, परीक्षा, तपास, बदली, शिस्तभंग कारवाई, गोपनीय अहवाल, अपघात व्यवस्थापन, मालमत्ता व्यवस्थापन, न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सतर्कता, श्रम आणि औद्योगिक संबंध यासारख्या प्रक्रिया अनेक प्रशिक्षण तसेच व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जाणून घेण्यात आल्या. सॅप-ईआरपी प्रणाली वेगवान व अचूक आहे. सोबतच प्रत्येक क्रिया एकाधिक प्रभाव देत असल्याने एकाधिक नोंदीची कामे टाळली जाणे शक्य आहे.