अमरावती; कोरोनाच्या दुसऱ्या वेवच्या पार्श्वभूमीवर कोव्हीड रुग्णालयासह सर्व अत्यावशक सेवा तसेच ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी अमरावती परिमंडलात महावितरणचे सुमारे ४ हजार २५० हून अधिक अधिकारी, अभियंते व कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता संसर्ग लक्षात घेता उर्जा मंत्र्याच्या निर्देशानुसार शासकीय तसेच खाजगी रूग्णालये,कोव्हीडचे विशेष कक्ष,विलगीकरन कक्ष याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अत्यावशक सेवांना अखंडित वीजपुरवठा मिळेल याची विशेष खबरदारी महावितरणकडून घेतल्या जात आहे.या शिवाय अत्यावशक सेवेसाठी तत्काळ नवीन वीज जोडणी देण्याची प्रक्रियाही महावितरणकडून राबविली जात आहे.
लॉकडाऊनमध्ये नागरीकांना घरी बसणे सुरळीत वीज पुरवठ्यामुळेच शक्य होत आहे. त्यातच आता दिवसेंदिवस ऊन्हाचा पारा वाढत आहे. सर्वच नागरिक घरी असल्याने घरोघरी विविध विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर वाढला आहे. त्यामुळे काही ठिकाणी विविध कारखाने वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणचे कर्मचारी तातडीने धाव घेऊन तो पूर्ववत करत आहेत. कोरोनाच्या संकटातही महावितरणचे कर्मचारी जीवावर उदार होऊन आपले कर्तव्य बजावित आहेत.
बॉक्स
४ हजारांवर कर्मचारी कार्यरत
अमरावती परिमंडळांतर्गत महावितरणचे ३७२ अभियंते, १९१६ जनमित्र, ६१९ यंत्रचालक, ८४० बाह्यस्त्रोत कर्मचारी, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी काम करत आहे. यासोबतच तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या सहाय्यासाठी व्यवस्थापनातील ५१० पेक्षा अधिक अतांत्रिक कर्मचारीही आपली सेवा बजावत आहे.
बाॅक्स
वर्षभरात ३५३ कर्मचारी कोरोना बाधित
कोरोनाचे संकट बघता महावितरणचे कर्तव्य बजावताना वर्षभरात परिमंडळातील ३५३ कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. सद्यस्थितीत १४२ कर्मचारी हे कोरोना बाधित असून ०७ कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. अशा स्थितीत महावितरण ग्राहकांच्या सेवेत आहे.वीज ग्राहकांनी कोरोना विरूध्दच्या या लढाईला सहजतेने न घेता मास्क, सामाजिक अंतर राखत शासनांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचे पालन करून कामे करत आहेत.