शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांची डेडलाईन फसवी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2015 02:19 IST

बडनेरा-अमरावती राज्य मार्गावरील नरखेड रेल्वे मार्गावर मागिल काही वर्षांपासून रेल्वे पूल व जोडरस्ता निर्मितीचे

रेल्वे प्रकल्पाचे काम लांबणार : बडनेरा मार्गावरील पूल, जोडरस्ता एप्रिलपासून सुरु होणे अशक्यअमरावती : बडनेरा-अमरावती राज्य मार्गावरील नरखेड रेल्वे मार्गावर मागिल काही वर्षांपासून रेल्वे पूल व जोडरस्ता निर्मितीचे काम संथगतीने सुरु आहे. परिणामी हा चौपदरीकरण मार्ग नव्या वर्षात १ एप्रिलपासून सुरु करण्याची खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिलेली डेडलाईन सद्यस्थितीत पूर्ण होणार नाही, हे स्पष्ट आहे.अमरावती-बडनेरा मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम युद्धस्तरावर सुरु असले तरी नरखेड रेल्वे मार्गावर पुलाचे काम तसेच या पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम काही वर्षांपासून कासवगतीने सुरु आहे. पूल व रस्ता निर्मितीचे काम ‘ठक्कर अ‍ॅन्ड संचेती कन्स्ट्रक्शन’ कंपनीने घेतले आहे. परंतु हे काम अतीशय संथगतीने सुरु असल्यामुळे बडनेरा मार्गावरील रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. दरम्यान नरखेड मार्गावरील रेल्वेपूल, रस्ता निर्मितीचे काम ३१ मार्च २०१६ पर्यंत पूर्ण करु न हा मार्ग १ एप्रिलपासून नागरिकांच्या सेवेत दाखल व्हावा, यासाठी खासदार अडसूळ यांनी मुंबई मध्ये रेल्वे विभागाच्या महाप्रबंधकांना पत्रवजा डेडलाईन दिली होती. खासदारांनी दिलेल्या डेडलाईनुसार मध्यंतरी विकासकामांना गती मिळाली होती. मात्र, काही दिवसांपासून पुन्हा या कामाची गती मंदावली आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून हा चौपदीकरण मार्ग नागरिकांच्या सेवेत दाखल होईल काय? याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. नरखेड मार्गावर रेल्वे प्रशासनाकडून निर्माणाधीन पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी या पुलाला जोडणाऱ्या अप्रोच मार्ग अद्यापही पूर्ण व्हायचा आहे. तसेच जोडरस्ता निर्मितीचे काम रखडले असल्याचे दिसून येते. खासदार अडसूळ यांच्या डेडलाईनुसार या मार्गाचे काम पूर्ण करुन तो नागरिकांच्या सेवेत दाखल करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. बडनेरा मार्गावरील रेल्वे पूल, रस्तानिर्मिती स्थळाची पाहणी केली जाईल. १ एप्रिल २०१६ रोजी हा मार्ग सुरु व्हावा यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांना अवगत करु. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न सुरुच आहेत.- आनंदराव अडसूळ, खासदार, अमरावती.रेल्वे प्रकल्पाचे काम मार्च २०१६ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. मात्र, प्राधिकरणच्या जलवाहिनीचा अडथळा येत आहे. टार्गेटनुसार कामे होतील. जलवाहिनीहटविताच कामाला गती येईल.- यू.डी. उदापुरे, सहायक अभियंता, रेल्वे नागपूर