फोटो( कॅप्शन जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता रस्त्याची पाहणी करीत असताना)
----------------------------------------------------------------------------
सेमाडोह-माखला मार्ग बंद, मेळघाटात ढगफुटीचा परिणाम
नरेंद्र जावरे - चिखलदरा : मेळघाटात ढगफुटीप्रमाणे कोसळलेल्या पावसात रस्त्यावर दोन ते तीन ठिकाणी अर्धा किलोमीटर लांब अशी एकूण दीड किलोमीटरपर्यंत सातपुडा पर्वतराजीच्या कडा खचून रस्त्यावर चिखल, झाडे व दगडांचा खच लागल्याचे शनिवारी सायंकाळी अभियंत्यांच्या पाहणीत पुढे आले. सेमाडोह-माखला-चुनखडी मार्गावर दोन जेसीबीने आठवडाभर काम केल्यानंतरही मार्ग सुरळीत होण्यास वेळ लागेल एवढे हे नुकसान आहे. आता वाहतुकीसाठी धोकादायक ठरलेल्या या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी एक कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
मेळघाटात पावसाने कहर केला. २२ जुलै रोजी ढगफुटीसारख्या कोसळलेल्या पावसाने सेमाडोह-माखला-चुनखडी मार्गावर एकूण दीड किलोमीटर किलोमीटरपर्यंत पहाड कोसळत आला. शनिवारी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता प्रमोद ठाकरे, शाखा अभियंता राहुल शेंडे, जिल्हा परिषद सदस्य सुनंदा काकड, शिवा काकड, व्याघ्र प्रकल्प कर्मचारी आदींनी मार्ग सुरळीत करण्यासाठी पाहणी दौरा केला असता, हा धक्कादायक प्रकार पुढे आला. व्याघ्र प्रकल्पाच्या अंमलाखालील क्षेत्रातून हा रस्ता जातो. या मार्गातील बिच्छुखेडा, माडीझडप या दोन गावांचा संपर्क तुटला आहे.
बॉक्स
दोन जेसीबीने आठवडाभर लागनार
दोन जेसीबी यंत्राद्वारे सलग काम केल्यास रस्ता क्लिअर होण्यास कमीतकमी एक आठवडा लागू शकतो असा अंदाज उपस्थित पाहणी दौऱ्यात बांधकाम अभियंत्यनी काढला आहे पाऊस कोसळला आज किंवा इतर कारणाने कामात व्यक्ती आल्यास अजूनही वेळ लागणार असल्याचे चित्र आहे
बॉक्स
बांबू, सागवानाची झाडे, पाषाण कोसळले
सेमाडोह-माखला रस्त्याची अतिवृष्टीमुळे फारच वाईट स्थिती झाली आहे. सलग अर्ध्या किलोमीटरपर्यंत दरड घसरल्याने सोबत सागवान, बांबूची झाडे, मोठे पाषाण रस्त्यावर आले. जेसीबीलाही ते उचलले जाणार नसल्याने ब्लास्टिंग करून रस्ता मोकळा करावा लागणार आहे.
माखला, बिच्चुखेडा, माडीझडप संपर्क क्षेत्राबाहेर
दरड कोसळल्याने माखला, बिच्छुखेडा, माडीझडप या तिन्ही गावे संपर्काबाहेर झाली आहे. दोन्ही मार्गावरील या गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची मागणी होत आहे. या मार्गावर जवळपास एक कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यानंतरच आदिवासी पाडे जगाच्या संपर्कात येणार आहेत.
बॉक्स
आरोग्य यंत्रणा हतबल, दोन गर्भवती माता
बिच्छुखेडा, माडीझडप या दोन गावांमध्ये दोन गर्भवती माता असून, दोन्ही गावांची लोकसंख्या एक हजार आहे. खंडू नदीलाही पूर असल्याने दोन्हीकडील मार्ग बंद झाले आहेत. अशा या आदिवासी महिलांचा कुपोषित बालकांचा उपचार व इतरही समस्या निर्माण झाल्या आहेत. आरोग्य यंत्रणा तिथपर्यंत पोहोचू शकत नसल्याचे काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आदित्य पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
कोट
बिच्छुखेडा, माडीझडप ही दोन्ही गावे खचलेला रस्ता व नदीला पूर यामुळे संपर्कविहीन झाली आहेत. दोन गर्भवती माता व इतर आजारांसाठी केवळ अंगणवाडी सेविका गावात आहेत.
- डॉ. आदित्य पाटील, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, काटकुंभ
कोट
रस्त्याची पाहणी केली असता, अत्यंत विदारक स्थिती आहे. आठवड्यापेक्षा अधिक कालावधी लागू शकतो. दोन गावांचा संपर्क तुटला आहे. ठिकठिकाणी पहाड खचल्याने दीड किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर सलग मोठे पाषाण, सागवान, बांबूचे झाड, माती यामुळे पूर्ण रस्ता ब्लॉक झाला आहे.
- प्रमोद ठाकरे, उपविभागीय अभियंता, बांधकाम विभाग