शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रप्रमुखांना जिल्हास्तरावर ‘कार्यप्रेरणा’ प्रशिक्षण

By admin | Updated: May 31, 2015 00:14 IST

पर्यवेक्षकीय यंत्रणेला शिक्षणातील बदलते विचार, नियोजन व कृती कार्यक्रम अवगत करून देणे गुणवत्ता ...

गुणवत्ता विकास : पर्यवेक्षकीय यंत्रणेचे होणार क्षमता संवर्धनअमरावती : पर्यवेक्षकीय यंत्रणेला शिक्षणातील बदलते विचार, नियोजन व कृती कार्यक्रम अवगत करून देणे गुणवत्ता विकासासाठी महत्वपूर्ण आहे. राज्य शासनाने निश्चित केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्राथमिक शिक्षणातील गुणवत्ता संवर्धनाकरिता राज्यातील सर्व केंद्रप्रमुखांना येत्या शैक्षणिक सत्रात कार्यप्रेरणा प्रशिक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पर्यवेक्षकीय यंत्रणेद्वारा निवडक शाळांमध्ये नवनवीन उपक्रम राबविणे, विकेंद्रीत पद्धतीने तालुका व केंद्रपातळीवर प्रशिक्षण देणे, एकात्मिक गुणवत्ता विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे, तंत्रस्नेही शाळांना प्रोत्साहित करणे आदी कार्यक्रमाची जागृती करणे, या योजनांच्या अंमलबजावणीसाठी पर्यवेक्षीय यंत्रणेला सुलभकाची भूमिका निभवावी. यासाठी राज्यातील सर्व केंद्र प्रमुखांना जिल्हास्तरावर ‘कार्य प्रेरणा प्रशिक्षण’ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार येत्या सत्रात सर्व केंद्रप्रमुखांना जिल्हास्तरावर एक दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाला मार्गदर्शन करण्यासाठी राज्यस्तरावरून स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. या पथकातील तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारा कार्यप्रेरणा प्रशिक्षणास उद्बोधन करण्यात येणार आहे. गुणवत्तापूर्ण प्रत्येक बालकांचा घटनादत्त अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक बालकास मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यासाठी शिक्षण विभागात विविध स्तरावर पर्यवेक्षीय व संनियंत्रण यंत्रणा काम करीत आहे. यामध्ये बहुतांश घटक, स्वयंप्रेरणेने व जोमाने शाळांमध्ये सुधारणात्मक बदल घडवून मुलांची गुणवत्ता वाढ या एकमेव ध्येयाने सर्वांना सोबत घेऊन काम करीत आहेत. मात्र सर्व शाळा व सर्व क्षेत्रीय अधिकारी यांचा सक्रिय सहभाग व समन्वयाचा अभाव असल्याने प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेच्या दृष्टीने सार्वत्रिकीकरणाचे उद्दीष्ट पूर्णत: साध्य झालेले नाही. त्यामुळे शिक्षण विभागाद्वारा नाशिक व मुंबई वगळता सर्व जिल्ह्यातील केंद्र प्रमुखांना २६ जून ते ७ जुलै दरम्यान प्रशिक्षित केले जाणार आहे. (प्रतिनिधी)सात लाख शिक्षकांना शैक्षणिक मार्गदर्शन राज्यात १ लाख ४ हजार प्राथमिक शाळांमधून १ कोटी ६१ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यासाठी राज्यांमध्ये ४०८ गट व शहर साधन केंद्र व ६१७० समूह साधन केंद्र कार्यरत आहेत. यामध्ये कार्यरत सात लाख शिक्षकांना शैक्षणिक मार्गदर्शन केंद्रप्रमुखांद्वारा करण्यात येणार आहे.