शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुलांच्या विरहात मातेचा आत्मघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:21 IST

मुलांना भेटण्याची अतीव इच्छा होती. पती मात्र मुलांना भेटू देत नव्हता, या उद्वेगातून मुलांच्या विरहात व्याकूळ झालेल्या मातेने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले.

ठळक मुद्देमहिलेचा मृत्यू : चिंचोली रहिमापुरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मुलांना भेटण्याची अतीव इच्छा होती. पती मात्र मुलांना भेटू देत नव्हता, या उद्वेगातून मुलांच्या विरहात व्याकूळ झालेल्या मातेने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. ही हृदयद्रावक घटना रहिमापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभारगाव येथे घडली. या दुर्दैवी मातेचा २८ एप्रिल रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.सुवर्णा अमोल अडेकर (३२) असे मृताचे नाव आहे. तिने मृत्यूपूर्वी दिलेल्या बयानानुसार, सदर महिलेचा विवाह २००७ मध्ये अमोल अडेकार यांच्याशी झाला. त्यांचा सुखी संसार सुरू होता. त्यांना दोन मुले झाली. त्यानंतर त्यांच्याकडेच राहत असलेली नणंद अंजली उमेकर हिने अमोलकडे सुवर्णाच्या कागाळ्या केल्या. त्यामुळे पती मारहाण करून शिवीगाळ करू लागला. चार वर्षांपूर्वी एके दिवशी पतीने सुवर्णाला आई-वडिलांकडे माहेरी आणून सोडले. तेव्हापासून पतीने तिला घरी नेले नाही, तर दोन मुलांनासुद्धा भेटू दिले नाही. २८ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता सुवर्णाच्या माहेरी तिचे बाबा व भाऊ दोघेही झोपले होते, तर आई घराबाहेर गेली होती. घरात विचारमग्न अवस्थेत असलेल्या सुवर्णाला मुलांची आठवण येताच आपसूक डोळ्यातून अश्रू बाहेर पडले. मुलांना बघण्याची, त्यांना माया देण्याची अतृप्तता मनात होती. मुलांपासून वंचित राहून आणखी किती दिवस जगायचे, काय करावे-काय नाही, या दुविधेत असलेल्या सुवर्णाने अखेर टोकाचा निर्णय घेत घरात ठेवलेली रॉकेलची डबकी स्वत:च्या अंगावर ओतली आणि माचीसने पेटवून घेतले. साडीने पेट घेतल्याने आगीचा विळखा घट्ट झाला. त्याची जाणीव होताच तिने आरडाओरड केली. वडील, भाऊ व शेजारी धावून आले आणि त्यांनी आग विझविली. भाजलेल्या सुवर्णाला आॅटोत टाकून जिल्हा सामान्य रुग्णलायात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सुवर्णा ८८ टक्के भाजल्याचे स्पष्ट केले. तिच्यावर तत्काळ वार्ड क्रमांक ४ मध्ये उपचार सुरू करण्यात आला. मात्र, काही तासानंतरच तिची प्राणज्योत मालवली. तिने शहर कोतवाली पोलिसांना मृत्यूपूर्वी दिलेल्या बयाणात तिच्या जीवनातील हृदयद्रावक प्रसंग विशद केला.कुणावर करणार पोलीस कारवाई?सुवर्णाच्या पतीने तिला माहेरी आणून टाकले. मुलांना भेटण्यापासून वंचित ठेवले. त्यामुळे तिने मुलांच्या विरहात आत्महत्या केली. आता रहिमापूर पोलीस कुणावर कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अमरावती येथील शहर कोतवाली ठाण्याकडून अद्याप डायरी प्राप्त झालेली नाही. संबंधित महिलेने दिलेल्या बयानाचे दस्तऐवज प्राप्त झाल्यावर पुढील कारवाईची दिशा ठरविण्यात येईल.- सचिन सिरसाट,ठाणेदार, रहिमापूर ठाणे.