आरोग्य अभियान : ४ लाख ३२ हजार अनुुदानाचे वाटपतिवसा: केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या जननी सुरक्षा योजनेचा तालुक्यातील ५६२ गरोदर मातांना वर्षभरात लाभ मिळाला आहे. यासाठी या विभागाने ४ लाख ३२ हजार ४८० रुपयांचे अनुदान वाटप केले आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण भागातील रहिवासी, दारिद्र्यरेषेखालील अनुजाती-जमाती कुटुंबातील गरोदर मातांना या योजनेखाली प्रसूतिकाळात लाभ घेता येतो. अशा गरोदर मातांची प्रसूती ग्रामीण भागातील शासकीय अथवा ‘जेएसवाय’ मानांकित आरोग्य संस्थेत झाल्यास मातेला या योजनेंतर्गत ७०० रुपये अनुदानाचा लाभ मिळतो. सिझेरियन झाल्यास १५०० रुपये अनुदानास त्या पात्र ठरतात. एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या वर्षभराच्या कालावधीत तालुक्यात या योजनेखालील ५६२ गरोदर मातांच्या प्रसूती झाल्या असून ४ लाख ३२ हजार ४०० रुपयांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
जननी सुरक्षा योजनेचा मातांना लाभ
By admin | Updated: April 14, 2016 00:02 IST