शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
8
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
9
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
10
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
11
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
12
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
13
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
14
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
15
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
16
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
17
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
18
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
19
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
20
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...

तिशीतील युवा शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या

By admin | Updated: January 1, 2017 00:47 IST

सततचा दुष्काळ, नापिकीचे सत्र यामुळे वाढणारे कर्ज आदींमुळे नैराश्य येऊन दीड दशकात अमरावती विभागासह

धक्कादायक वास्तव : विमुक्त जाती-जमातीमधील शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक, सातबारा कोरा करणे हा पर्याय गजानन मोहोड अमरावती सततचा दुष्काळ, नापिकीचे सत्र यामुळे वाढणारे कर्ज आदींमुळे नैराश्य येऊन दीड दशकात अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यातील १३ हजार ४५६ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास जवळ केला. यामध्ये सर्वाधिक एक हजार ५३२ आत्महत्या ह्या ३० ते ४५ वयोटातील आहे व यामध्ये विमुक्त जाती-जमातीमधील शेतकऱ्यांचे प्रमाण २८ टक्के असल्याची धक्कादायक माहिती आहे. १ जानेवारी २००१ ते २५ डिसेंबर २०१६ या कालावधीत सर्वाधिक शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या. या जिल्ह्यात ३ हजार ७०४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. २०१५ पर्यंत सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असणारा जिल्हा, अशी यवतमाळची ओळख होती. परंतु यंदा २०१६ मध्ये राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या अमरावती जिल्ह्यात झाल्यात. यंदा २५ डिसेंबरपर्यंत ३४० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यापूर्वी राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असणाऱ्या यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यात २४ जुलै २०१५ च्या शासन निर्णयानुसार विशेष मदतीचा कार्यक्रम घेण्यात आला. त्याचे सकारात्मक परिणाम यंदा दिसून आले. विदर्भ व मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक शेतकरी होत असल्याने शेतकरी आत्महत्येचा शोध घेण्यासाठी व तातडीची उपाययोजना करण्यासाठी तसेच सामाजिक, आर्थिक व मनोवैज्ञानिक अभ्यासासाठी शासनाने ‘इंदिरा गांधी आॅफ डेव्हलपमेंट रिसर्च’ या संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये शेतकरी आत्महत्यामागे कर्जबाजारीपणा, नापिकी किंवा कमी उत्पन्न, आजारीपणा, मुलीच्या लग्नासाठी कर्जबाजारी, शेतीशिवाय उत्पन्नाचे साधन नाही व शेती उत्पन्नातून अधिक नफ्यासाठी मूल्य वृद्धी नाही आदी अनेक कारणे समोर आली. यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करून शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यासाठी विशेष योजना राबविण्यात आल्या. मात्र खऱ्या शेतकरी लाभार्थ्यांपर्यंत या योजना पोहोचत नाहीत. कायमस्वरुपी व दीर्घकालीन उपाययोजनापेक्षा वरवरची मलमपट्टी करण्यावर आजवर शासनाने भर दिल्याने शेतकरी आत्महत्येचे प्रमाण काही जिल्ह्यात वाढत आहे.