शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

धारणीतील बहुतांश शाळांना शिवजयंतीचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 23:34 IST

राष्ट्रीय पातळीवरील महापुरुषांचे जयंती व पुण्यतिथी जि.प. शाळेत साजरी करण्याचे नियम असताना, सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी बहुतांश शाळांतील मुख्याध्यापकांनी ‘सुटी’चा आनंद घेतला.

ठळक मुद्देविद्यार्थी शिवचरित्रापासून वंचित : शनिवारीच बोर्डावर लिहून शिक्षक अनुपस्थित

आॅनलाईन लोकमतधारणी : राष्ट्रीय पातळीवरील महापुरुषांचे जयंती व पुण्यतिथी जि.प. शाळेत साजरी करण्याचे नियम असताना, सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी बहुतांश शाळांतील मुख्याध्यापकांनी ‘सुटी’चा आनंद घेतला. त्यामुळे महापुरुषांच्या कर्तबगारीचा बोध घेण्यापासून विद्यार्थी वंचित राहिलेत. शासकीय नियमांची पायमल्ली करणाºया अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.छत्रपती शिवाजी महाराज जयंतीबाबत सोमवारी जि.प. शाळांतील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी प्रतिनिधीने तालुक्यातील धोदरा, सावºया, पाथरपूर, खारी या गावांना भेट दिली. येथे मुख्याध्यापकांसह शिक्षकांनीही दांडी मारल्याचे निदर्शनास आले. यापैकी खारी येथील जि.प. उच्च माध्यमिक शाळेत शिक्षकांनी शनिवारीच शाळेच्या दर्शनी भागात लावलेल्या सूचना फलकावर जयंतीनिमित्त शिवाजी महाराजांबद्दल माहिती लिहून ठेवले होते. मात्र, शाळेत एकही शिक्षक आले नसल्याचे समजले.धोदरा, सावºया व पाथरपूर येथील जि. प. मराठी शाळेत सूचना फलक कोरे होते. विशेष म्हणजे, धोदरा शाळेतील सूचना फलकावर नवीन वर्षाच्या शुभेच्छा लिहिल्याचे दिसून आले. या शाळेतील काही विद्यार्थी शाळा परिसरात मिळून आले. त्यांना आपल्या शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकांचेच नाव माहीत नसल्याची धक्कादायक बाब त्यांच्याशी संवाद साधताना अनुभवास आली.मी शिवजयंतीबाबत माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर घेत आहे. धोदरा, सावºया, पाथरपूर व खारी शाळेची माहिती अप्राप्त आहे. कार्यक्रम न घेतल्याचे समजल्यास कारवाई करण्यात येईल.- मो. युनूस इस्माईलगटशिक्षणाधिकारी, धारणी