शहरं
Join us  
Trending Stories
1
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
2
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
3
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
4
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
5
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
6
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
7
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
8
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
9
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
10
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
11
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
12
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
13
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
14
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
15
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
16
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
17
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
18
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
19
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
20
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

माहिती अधिकाराची सर्वाधिक प्रलंबित प्रकरणं अमरावती विभागात

By admin | Updated: August 10, 2015 23:04 IST

राज्यभरात व्दितीय अपिलांमधील २४ हजार प्रकरणांना निकालाची प्रतीक्षा.

सुनील काकडे / वाशिम : माहिती अधिकार अधिनियमामुळे नागरिकांना लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकार्‍यांना त्यांच्या कामाचा जाब विचारण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. ही बाब सुप्रशासनासाठी आवश्यक असली तरी माहिती अधिकारातील प्रलंबित प्रकरणांची संख्या वर्षागणिक वाढत चालली असून एकट्या अमरावती विभागात आजमितीस ९४४ तक्रार अर्ज दाखल असून प्रलंबित व्दितीय अपिलांची संख्या ६ हजार ७३३ वर पोहोचली आहे. राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक आहे. २00५ मध्ये अस्तित्वात आलेल्या केंद्रशासनाच्या माहिती अधिकार अधिनियमाने यावर्षी दहाव्या वर्षांत पदार्पण केले आहे. या अधिनियमामुळे लोकसहभाग, पारदर्शकता व उत्तरदायित्व या तिन्ही अत्यावश्यक बाबींचा संगम घडवून आणला आहे. त्यामुळेच प्रत्येक वर्षी माहिती अधिकारांत दाखल होणार्‍या अर्जांची व तक्रारींची संख्या वाढत आहे. राज्यभरात २00९ पासून २0१५ पर्यंंत माहिती अधिकारांत दाखल झालेल्या तक्रारींमध्ये मुंबई (मुख्यालय) ६८, बृहन्मुंबई ५३६, कोकण ३१, पुणे ३५१, औरंगाबाद ३१७, नाशिक ४१0, नागपूर ६७, तर अमरावती विभागात ९४४, अशा एकूण २७२४ तक्रार अर्जांचा समावेश आहे. व्दितीय अपिलांमध्ये दाखल झालेल्या प्रकरणांमध्ये मुंबई (मुख्यालय) ४२५, बृहन्मुंबई २१५८, कोकण २९१७, पुणे ६५0१, औरंगाबाद १६२७, नाशिक ३५१0, नागपूर ३२0; तर अमरावती विभाग इतर विभागांच्या तुलनेत अव्वल असून या विभागातील व्दितीय अपिलांची संख्या ६७३३ आहे. राज्यभरात एकूण २४ हजार १९१ व्दितीय अपिलांची प्रकरणे प्रलंबित आहेत.