शहरं
Join us  
Trending Stories
1
"ओऽऽऽ *** सर्वज्ञानी…" म्हणत, चित्रा वाघ यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर; दिला थेट इशार
2
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
4
विश्वासदर्शक ठरावासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत हरियाणा सरकार!
5
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
6
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
7
पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर
8
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
9
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
10
हे व्यावसायिक, ते ४०० कोटी कमावतात तरी...! KL Rahul ला झापणाऱ्या मालकावर वीरूचा तिखट वार
11
Mother's Day 2024: आनंद महिंद्रा भावूक! शेअर केला आईसोबतचा जुना फोटो; नेटकरी गहिवरले
12
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 
13
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
14
Mother's Day निमित्त संजय दत्तने शेअर केली खास पोस्ट, चाहतेही झाले भावुक
15
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
16
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
17
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
18
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
19
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
20
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट

सर्वाधिक मोबाईल चोरी सार्वजनिक ठिकाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 6:00 AM

गतवर्षी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर दरम्यान १८८३ मोबाईल हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असल्या तरी शोध लागलेले ३१४ मोबाइलच सापडलेले आहेत. त्याची २५ लाख १३ हजार १०० रुपये रक्कम आहे. २०१८ मध्ये १ एप्रिल ते ३१ डिसेंबर दरम्यान ७२० मोबाइल हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ४२३ मोबाइलचा शोध पोलिसांनी लावला. हा मुद्देमाल ४३ लाख १० हजार ३०९ रुपयांचा आहे.

ठळक मुद्देशहरात १८८३ ‘मिसिंग’ : तक्रार नोंदविण्यास अनेकांची टाळाटाळ

संदीप मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मोबाइल चोरी गेल्याची तक्रार भादंविच्या कलम ३७९ अन्वये दाखल करून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येतो. मात्र, सायबर पोलीस मोबाइल हरविल्याची तक्रार घेऊन तांत्रिक तपासात धन्यता मानत आहेत. त्यामुळे गतवर्षी तब्बल १८८३ मोबाइल हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या, तर त्यापैकी ३१४ संचांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. गर्दीच्या सार्वजनिक मोबाइलचोरांपासून सावध राहा, असे आवाहन करण्यास मात्र हा विभाग विसरत नाही.गतवर्षी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर दरम्यान १८८३ मोबाईल हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असल्या तरी शोध लागलेले ३१४ मोबाइलच सापडलेले आहेत. त्याची २५ लाख १३ हजार १०० रुपये रक्कम आहे. २०१८ मध्ये १ एप्रिल ते ३१ डिसेंबर दरम्यान ७२० मोबाइल हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ४२३ मोबाइलचा शोध पोलिसांनी लावला. हा मुद्देमाल ४३ लाख १० हजार ३०९ रुपयांचा आहे. तक्रारकर्ते ठाण्याच्या पायऱ्या झिजवितात. पण, ‘चोरी’ आणि ‘गहाळ’च्या चक्रात त्याची येरझारा करण्यातच दमछाक होते.महिनाभरात पोलिसांनी शोधले १०७ मोबाइलपोलीस आयुक्तांच्या आदेशावरून राबविलेल्या मोहिमेत महिनाभरात पोलिसांनी विविध ठाण्यांच्या हद्दीतून आरोपींकडून १०७ हरविलेल्या मोबाइलचा शोध घेतला. त्याची रक्कम १० लाख एवढी आहे.मोबाइल शोधण्याकरिता सायबर पोलीस ठाण्यात दोन पथके स्थापन केली आहेत.मोबाइल लंपास; मात्र तक्रार हरविल्याचीअनेकदा मोबाइल चोरीला जातो किंवा खिशातून किंवा पर्समधून अलगद काढून घेतला जातो. अनेकदा चोरीचा गुन्हा तातडीने दाखल करीत नाही. त्यामुळे चोरी झाली असतानाही तक्रारदाराकडूनच मोबाइल हरविल्याची तक्रार लिहून घेतली जाते. परिणामी मोबाइल चोरल्याचे गुन्हे कमी व हरविलेल्याची प्रकरणे जास्त आहेत. मोबाइलचे लोकेशन इतर राज्यात दाखवित असेल, तर पोलीसदेखील फारसा रस घेत नाहीत.मोबाइलचोरीच्या ११ गुन्ह्यांतील १६ संच शोधलेविविध ठाण्यांच्या हद्दीत मोबाइलचोरीच्या ११ दाखल गुन्ह्यांचा तपास सायबर पोलिसांकडे आला होता. त्यांनी त्याचा तांत्रिक तपास करून ११ गुन्ह्यांतील १६ मोबाइल आरोपींकडून जप्त केले. यासंदर्भात पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.येथून चोरी होण्याचा सर्वाधिक धोकाबस स्थानक, रेल्वे स्थानक, शाळा-महाविद्यालये, परीक्षा केंद्र, बँक, बसच्या गर्दीत तसेच मुख्य चौकांत सार्वजनिक ठिकाणी मोबाइल गहाळ होण्याच्या सर्वाधिक घटना घडतात. मात्र, याकडे नागरिकांचे दुर्लक्ष असते. संपर्काचे माध्यम व त्यामुळेच दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा घटक असल्याने आपल्याकडील मोबाइलबाबत प्रत्येकाने सतर्क राहणे गरजेचे आहे.वर्षभरात १८८३ मोबाइल हरविल्याच्या तक्रारी झाल्या आहेत. पैकी ३१४ मोबाईलचा शोध लावून ते नागरिकांना परत केले. चोरीला गेलेल्या मोबाइलचा तपास संबंधित पोलीस ठाण्यात सुरू आहे. तांत्रिकदृष्ट्या आमचे सहकार्य असते. इतर तक्रारींचा तपास सुरू आहे.- प्रवीण काळेपोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशनसर्तकता बाळगाउघड्यावर मोबाइल चार्जिंगला ठेवू नका. कुठल्याही अनोळखी व्यक्तीला तो देऊ नका. वरच्या खिशात ठेवू नका. पर्समध्ये मोबाइल ठेवून बस, ट्रेन किंवा गर्दीच्या ठिकाणी वावरताना सावधगिरी बाळगली पाहिजे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

टॅग्स :Mobileमोबाइल