शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

सर्वाधिक हिंदू-मुस्लिम लोकसंख्या अचलपूर तालुक्यात

By admin | Updated: August 31, 2015 00:08 IST

जिल्ह्यात अमरावती महापालिका क्षेत्र वगळता सर्वाधिक २ लाख ७९ हजार ४७९ लोकसंख्या अचलपूर तालुक्याची आहे.

गजानन मोहोड अमरावतीजिल्ह्यात अमरावती महापालिका क्षेत्र वगळता सर्वाधिक २ लाख ७९ हजार ४७९ लोकसंख्या अचलपूर तालुक्याची आहे. धर्मनिहाय जनगणनेत जिल्ह्यात हिंदू, मुस्लिम, जैन व ख्रिश्चन समाजाची सर्वाधिक लोकसंख्या अचलपूर तालुक्यात आहे, तर बौद्ध समाजाची सर्वाधिक लोकसंख्या दर्यापूर तालुक्यात आहे. जिल्ह्याची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार २८ लाख ८८ हजार ४४५ एवढी आहे. यामध्ये अमरावती महापालिकेच्या हद्दीमध्ये ६ लाख ४७ हजार ५७ लोकसंख्या आहे. मात्र जिल्ह्याच्या ग्रामीण भागात असणाऱ्या १४ तालुक्यांपैकी सर्वाधिक लोकसंख्या अचलपूर तालुक्याची आहे. धारणी तालुक्याची लोकसंख्या १ लाख ८४ हजार ६६५ आहे यामध्ये ९३ हजार ८९८ पुरुष व ९० हजार ६७६ महिला आहेत. चिखलदरा तालुक्याची १ लाख १८ हजार ८१५ लोकसंख्या आहे. यामध्ये ६० हजार ७२३ पुरुष व ५८ हजार ९२ महिलांची लोकसंख्या आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यात १ लाख ६० हजार ९०३ लोकसंख्या आहे. यामध्ये ८२ हजार ६७९ पुरुष व ७८ हजार २२४ महिला आहेत. चांदूरबाजार तालुक्यात १ लाख ९६ हजार २५८ लोकसंख्या आहे. यामध्ये १ लाख ७२९ पुरुष व ९५ हजार ५२९ महिला आहेत. मोर्शी तालुक्यातील १ लाख ८२ हजार ४८४ लोकसंख्या आहे. यात ९३ हजार ७८३ पुरुष व ८८ हजार ७०१ महिलांची लोकसंख्या आहे. चांदूररेल्वे तालुका लाखाच्या आतअमरावती : वरुड तालुक्यात २ लाख २४ हजार ९८४ लोकसंख्या आहे. यामध्ये १ लाख १५ हजार ६८७ पुरुष व १ लाख ९ हजार २९७ महिला आहे व तिवसा तालुक्याची लोकसंख्या १ लाख ४ हजार ७२८ आहे. यात ५३ हजार ८११ पुरुष व ५० हजार ९१७ महिला आहेत. अमरावती तालुक्याची लोकसंख्या १ लाख ४१ हजार २७० आहे. यामध्ये ७३ २३४ पुरुष व ६८ हजार ३६ महिलांची लोकसंख्या आहे. भातकुली तालुक्यात १ लाख १३ हजार १०९ लोकसंख्या आहे. यात ५८ हजार १५ पुरुष व ५५ हजार ९४ महिलांची संख्या आहे. दर्यापूर तालुक्याची लोकसंख्या १ लाख ७५ हजार ६१ ऐवढी आहे यामध्ये ८९ हजार ६८० पुरुष व ८५ हजार ३८१ महिला आहेत. नांदगाव तालुक्यात १ लाख २९ हजार ८१० लोकसंख्या आहे. यामध्ये ६६ हजार ६६१ पुरुष व ६३ हजार १४९ महिला आहेत. धामणगाव तालुक्यात १ लाख ३२ हजार ९१५ लोकसंख्या आहे. यामध्ये ६८ हजार २८३ पुरुष व ६४ हजार ६३२ महिला आहेत.