शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन पिकावर मोझॅकचा अटॅक, नवे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 22:52 IST

यंदाच्या खरिप हंगामात सर्वाधिक पेरणीक्षेत्र असलेल्या सोयाबीन पिकावर सध्या विषाणुजन्य येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाला आहे.

ठळक मुद्देव्यवस्थापन महत्त्वाचे : विषाणूजन्य रोगामुळे सरासरी उत्पादनात कमी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरिप हंगामात सर्वाधिक पेरणीक्षेत्र असलेल्या सोयाबीन पिकावर सध्या विषाणुजन्य येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाला आहे. इतर रोगापेक्षा हा अधिक हानीकारक असल्याने सरासरी उत्पादनात ५० ते ९० टक्के कमी येण्याची शक्यता असल्याने वेळीच नियोजन करणे महत्त्वाचे आहे.यंदा जिल्ह्यात दोन लाख ८६ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. यामधील बहुतांश क्षेत्रातील सोयाबीन पिवळे पडले. सोयाबीनचे पीक हे सध्या शेंगा धरण्याच्या व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.काही उच्च प्रतवारीच्या जमिनीत अधिक ओलावा असल्याने मुळांना श्वास घेण्यास अडचणी निर्माण होतात.त्यामुळे जमिनीतील पोषक द्रव्ये शोषूूण घेता येत नाही. त्यामुळे पाने पिवळी पडतात. सतत ढगाळ वातावरण असल्यास अपुºया सूर्यप्रकाशामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते. त्यामुळेही पाने पिवळी पडतात. पानावर हिरवे पिवळे चट्टे आढळतात.सूत्रकृमीच्या प्रादुर्भावाने पाने पिवळी पडतात. मुळकुज रोगाच्या प्रादुर्भावानेसुद्धा पाने पिवळी पडतात. त्यामुळे शेंगा पोचट राहतात. सरासरी उत्पादनाच प्रचंड कमी येते. यासाठी वेलीच व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे, असा होतो.पिवळ्या मोझॅकचा प्रसारहा रोग मुंगबीन येलो मोझॅक विषाणूमुळे होतो. या विषाणूची वाहक पांढरी माशी आहे. उबदार तापमान, वाहक पांढºया माशीची अधिक संश्या, अती दाट पेरणी, प्रमाणापेक्षा अधिक नत्राचा वापर या दोन बाबी रोग वाढण्यास कारणीभूत ठरतात. यामुळे उत्पादनात घट येणार आहे.अशा आहेत उपाययोजनाविषाणुजन्य रोगाची लक्षणे असलेली झाडे दिसताच त्वरित उपटून जाळावीत. रोग प्रतिकारक जातीची लागवड करावी. तणाचा बंदोबस्त करावा. मावा व पांढºया माशीचा बंदोबस्त करण्यासाठी ट्रायझोफॉस ४० टक्के २५ मिली किंवा अ‍ॅसिफेट ७५ टक्के २० ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.पिवळ्या मोझॅकचा पहिल्या ७५ दिवसांपर्यंत प्रादुर्भाव झाल्यास अधिक नुकसान होते. नंतर संक्रमण झाल्यास नुकसानीची पातळी कमी असते. पांढºया माशीच्या व्यवास्थापनासाठी मिथिल डेमेटोन १० मिली किंवा डायमिथिएट १० मिली किंवा थायोमिथोक्जन ०२ ग्रम १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असा सल्ला कृषितज्ज्ञांनी दिला आहे.असा आहे सोयाबीन मोझॅकसोयाबीन मोझॅक हा एक विषाणुजन्य रोग आहे. यामुळे ९० टक्क्यांपर्यंत उत्पादनात कमी येऊ शकते. या रोगाचा प्रसार मावा किडीमुळे व बियाण्यामधील विषाणू कुळातील मोझॅक विषाणुमुळे होतो. झाडाची वाढ खुंटणे. पाने लहान, आखुड, जाडसर होतात. पाने हिरवी दिसतात. झाडाला शेंगा कमी लागतात. त्याही पोचट असतात.दाणे कमी असतात.अशी आहेत रोगाची लक्षणेरोगग्रस्त पानाचा काही भाग हिरवट, तर काही भाग पिवळसर दिसून येतो. शेंड्याकडील पाने पिवळसर पडून आकाराने लहान होतात. पानातील हरितद्रव्य नाहिसे झाल्याने अन्ननिर्मितीमध्ये बाधा निर्माण होऊन उत्पादनात मोठी कमी येते. हिरवी पिवळी पाने नजरेने ओळखता येतात.