शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मोर्शीत डीजे व्यावसायिकांचा आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 21:52 IST

डी.जे. साऊंड सर्व्हिस व साऊंड बँड पथकावर लादण्यात आलेल्या बंदीच्या निषेधार्थ वरूड पंचायत समितीचे सभापती विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देडीजेवर बंदीचा निषेध : बाहेरच्या पथकांना शहरात प्रवेश देऊ नका

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : डी.जे. साऊंड सर्व्हिस व साऊंड बँड पथकावर लादण्यात आलेल्या बंदीच्या निषेधार्थ वरूड पंचायत समितीचे सभापती विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला.न्यायालयाच्या आदेशाने डी.जे.साऊंड सर्व्हिस व साऊंड बँड पथकावर बंदी लादण्यात आली. या बंदीमुळे वरूड, मोर्शी तालुक्यात व्यावसायिक व त्यांच्या अधिनस्थ कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. बंदी उठविण्यासाठी राज्य शासनाने बँड पथकाची बाजू न्यायालयात प्रभावीपणे मांडावी तसेच न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईस्तोवर वैयक्तिक स्तरावर बंदीवर तोडगा काढण्यात यावा, असे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकरिता देण्यात आले.वरूड, मोर्शी तालुक्यातील डी.जे. बँड पथकांवर निर्बंध आणि बाहेरून येणाºया बँड पथकांना मोकळीक असेल, तर याविरुद्ध मी स्थानिक डी.जे.पथक व बँड पथकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असे विक्रम ठाकरे म्हणाले.आंदोलनात शिवदास गायकवाड, संजय नागले, वासुदेवराव तायवाडे, अनिल कांबळे, प्रवीण इंगळे, राहुल इंगळे, अविनाश फुटाणे, प्रफुल बरडे, प्रवीण काळे, पवन खेरडे, हनुमंत शेळके, मुन्ना इंगोले, राहुल फुटाणे, लक्ष्मण उघडे, कृणाल टाकरखेडे, मयूर फुटाणे, विपुल सुपले, अक्षय सावरकर, सुशील अकर्ते तसेच वरूड-मोर्शी तालुक्यातील सर्व डी.जे.पथक व बँड पथकांचे मालक, कामगार उपस्थित होते.खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष मोरेश्वर गुडधे, मोर्शी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज इंगोले, उपाध्यक्ष विक्रम राऊत, महासचिव नीलेश लायदे, गोपाल सोरगे, संजय आखरे, वरूड न.प.चे नगरसेवक धनंजय बोकडे, मोर्शी न.प.चे नगरसेवक नितीन उमाळे, नितीन पन्नासे, सागर ठाकरे, राजू साठवणे, सुरेंद्र परतेकी, रीतेश भुयार तसेच युवा सेना पदाधिकारी अंकुश राऊत, भूषण राऊत यांनीसुद्धा आंदोलनाला पाठिंबा दिला.