शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मोर्शीनजीक वाघाचा बाप-लेकीवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 01:04 IST

नरभक्षक वाघाची दहशत जिल्ह्यावर असतानाच पुन्हा दोघांवर वाघाने हल्ला केल्याची घटना गुरुवारी दुपारी जामगाव खडका ते पांढरघाटी मार्गावरील उमरी ते गहू बारसा दरम्यान दुपारी ३.३४ वाजता घडली. नरभक्षक वाघाचे लोकेशन पलासपानी येथे असताना, हा वाघ कोणता, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ठळक मुद्देहा वाघ कोणता? : जखमींना अमरावतीला हलविले, मध्य प्रदेश सीमेवरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : नरभक्षक वाघाची दहशत जिल्ह्यावर असतानाच पुन्हा दोघांवर वाघाने हल्ला केल्याची घटना गुरुवारी दुपारी जामगाव खडका ते पांढरघाटी मार्गावरील उमरी ते गहू बारसा दरम्यान दुपारी ३.३४ वाजता घडली. नरभक्षक वाघाचे लोकेशन पलासपानी येथे असताना, हा वाघ कोणता, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.मोर्शी येथून अवघ्या १२ किमी अंतरावरील जामगाव खडका येथून शेतमजूर शंकर नरे हे त्यांच्या मुलीला घेऊन दुपारी ३ वाजताच्या सुमारास दुचाकीने मध्य प्रदेश सीमेवरील गहू बारसाकडे जात होते. मध्य प्रदेशातील सातपुडा परिक्षेत्रांतर्गत बैतूल जिल्ह्यातील उमरी ते गहू बारसा मार्गात अचानक वाघाने त्यांच्या दुचाकीवर हल्ला चढविला. त्या वाघाने शंकर नरे यांच्या मानेवर पंजा मारण्याचा पवित्रा घेतला होता. शंकर नरे यांनी तो चुकविला; मात्र वाघाच्या नखांनी शंकर नरे यांचे ओठ फाटले. दरम्यान, वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ते खाली कोसळला. दुचाकीवर त्यांच्यामागे बसलेली मुलगी मोनिका खाली कोसळली. वाघाचा पुन्हा हल्ला होणार तेवढ्यात मागून येत असलेल्या भांडेविक्रेत्याने मोठ्याने आरडाओरड केली. त्यामुळे गोंधळून वाघ घटनास्थळाहून पळाला. जखमी शंकर नरे व मोनिकाला शेतमालक सतीश गेडाम यांनी मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. उपचारादरम्यान शंकर नरे यांनी 'लोकमत'शी बोलताना ही माहिती दिली.दरम्यान, धामणगाव रेल्वे व तिवसा तालुक्यात दोघांना ठार करणाऱ्या नरभक्षक वाघाचे ताजे पगमार्क पलासपाणी शिवारातच दुपारी ३.२७ दरम्यान आढळून आले. त्यामुळे तो गहू बारसा भागात गेला नसावा. आम्ही लोकेशन घेत आहे, अशी माहिती मोर्शी वनपरिक्षेत्राधिकारी आनंद सुरत्ने यांनी दिली.जखमींना अमरावतीला हलविलेशंकर नरे व मोनिका यांच्यावर मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात डॉ. विवेक साबळे यांनी प्रथमोपचार केला. मोर्शी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक विजय कळस्कर यांच्या सल्ल्यानुसार त्यांना अमरावतीला हलविले.सतीश गेडाम यांच्या शेतात सोकारीशंकर नरे हे मध्य प्रदेशातील गहू बारसा येथील रहिवासी असून, ते मोर्शी येथील सतीश गेडाम यांच्या दापोरी शिवारातील शेतात सोकारीला आहेत.मध्य प्रदेशातील बैतूल येथे गुरुवारी वाघाचे लोकेशन मिळाले. त्याच्या मागावर वनविभागाचे कर्मचारी आहेत. मॉनिटरिंग व ट्रॅकिंग सुरूच आहे. यासंदर्भात उपवनसंरक्षकांना उपाययोजना करण्यास कळविले आहे.- सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर

टॅग्स :Tigerवाघ