शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोर्शीत लवकरच मत्स्य विज्ञान महाविद्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 22:05 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केल्यानुसार येथे शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. याअनुषंगाने नुकतीच मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्या चमुने बुधवारी, तर मुंबई येथील आयुक्तांनी शुक्रवारी पाहणी केली. त्यामुळे विद्यार्थी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.

ठळक मुद्देचमूकडून पाहणी : विद्यार्थ्यांत उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केल्यानुसार येथे शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. याअनुषंगाने नुकतीच मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्या चमुने बुधवारी, तर मुंबई येथील आयुक्तांनी शुक्रवारी पाहणी केली. त्यामुळे विद्यार्थी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या चमूने मोर्शी ते सिंभोरा मार्गावर असलेल्या राष्ट्रीय मत्स्यबीज केंद्रानजीक असलेल्या शासकीय जागेची पाहणी केली. यावेळी आ. बोंडे, नागपूर येथील शासकीय मस्यविज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता जाधव, छत्तीसगड येतील कामधेनू विद्यापीठाचे कुलगुरु वर्धे व मत्स्य विद्यापीठाचे भिंगारे, राऊत, गावंडे, सत्यजित बेलसरे व अमरावती येथील मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त श्याम गोटफोडे, प्रादेशिक उपायुक्त बालाजी पवार, संजय गारपवार, संदीप बाजड व धर्मे तसेच अजय आगरकर उपस्थित होते. शुक्रवारी मुंबई येथील आयुक्त नाईक यांनी जागेची पाहणी केली.पुढील शिक्षणाची सुविधाअमरावती विभागात शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालय नसल्याने या शाखेत पुढील शिक्षणासाठी अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी नागपूर, मुंबई, रत्नागिरी गाठतात. परंतु, आता ही संधी मोर्शीमध्ये उपलब्ध होण्याच्या शक्यतेने विद्यार्थी वर्गामध्ये उत्साह वाढला आहे.अनिल बोंडेंनी केली होती मागणीवरूड तालुक्यातील गव्हाणकुंड येथे शेकदरी तलावानजीक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २० मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन २४ डिसेंबर २०१७ रोजी झाले होते. त्यावेळी आ. अनिल बोंडे यांनी मोर्शी-वरूड भागात शासनाने मत्स्य विज्ञान महाविद्यालय सुरू करावे, अशी मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला होकार दर्शविला होता.