शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

मोर्शी, वरुडमध्ये सर्वाधिक; चांदुरात कमी पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 05:01 IST

यंदा रोहिणीचा मान्सूनपूर्व पाऊस, त्यानंतर ७ तारखेपासून मृगसरी व चार दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात मान्सूनचा पाऊस होत आहे. यामुळे पेरणीला आता वेग आलेला आहे. सद्यस्थितीत कपाशीची सर्वाधिक ७६ हजार १५३ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. त्यातुलनेत सोयाबीनची ३१ हजार ६२३ हेक्टरमध्ये पेरणी झाल्याची कृषी विभागाच्या १७ जूनच्या अहवालात नोंद आहे.

ठळक मुद्देखरीप हंगाम : दोन दिवसांपासून पाऊस गायब असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सर्वच तालुक्यांमध्ये आता खरिपाच्या पेरणीला वेग आलेला आहे. यामध्ये मोर्शी व वरूड तालुक्यात सर्वाधिक ५७ टक्क्यांपर्यंत पेरणी आटोपली. तिवसा तालुक्यात ३४, धामणगाव रेल्वे व अचलपूर तालुक्यात १८ टक्क्यांपर्यंत, तर चांदूर बाजार तालुक्यात सर्वांत कमी पेरणी झालेली आहे. दोन दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने आता पेरणी झालेल्या शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.यंदा रोहिणीचा मान्सूनपूर्व पाऊस, त्यानंतर ७ तारखेपासून मृगसरी व चार दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात मान्सूनचा पाऊस होत आहे. यामुळे पेरणीला आता वेग आलेला आहे. सद्यस्थितीत कपाशीची सर्वाधिक ७६ हजार १५३ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. त्यातुलनेत सोयाबीनची ३१ हजार ६२३ हेक्टरमध्ये पेरणी झाल्याची कृषी विभागाच्या १७ जूनच्या अहवालात नोंद आहे. याव्यतिरिक्त तूर १५ हजार २०८ हेक्टर, मूग १३८४ हेक्टर, उडीद २७२ हेक्टर, मका २०८ हेक्टर, भुईमूग १९० हेक्टर, ज्वारी १५५.७ हेक्टर, धान ४८.५ हेक्टर, तर भाजीपाल्याची ३३ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. बाजरी, तीळ, सूर्यफूल पिकांचे पेरणीक्षेत्र निरंक आहे.क्षेत्रनिहाय पाहता, मोर्शी तालुक्यात ३७ हजार ६१४ हेक्टर, वरूड २८ हजार ७३४, तिवसा १५ हजार ५४३ हेक्टर, अमरावती १० हजार ५१५ हेक्टर, धामणगाव रेल्वे ९७८० हेक्टर, अंजनगाव सुर्जी ८३०८ हेक्टर, चांदूर रेल्वे ४२९२ हेक्टर, अचलपूर ४१६२ हेक्टर, चिखलदरा २८९६ हेक्टर, दर्यापूर १६७५, नांदगाव खंडेश्वर ११६२, भातकुली ६८६, धारणी ६३८ हेक्टर व चांदूर बाजार तालुक्यात ७० हेक्टर अशी एकूण १ लाख २६ हजार १०५ हेक्टरवर सद्यस्थितीत पेरणी आटोपली आहे. जिल्ह्यात १ जून ते १७ जून या कालावधीत ८२.७ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना, प्रत्यक्षात ११९.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही टक्केवारी १४४.१ आहे.कपाशीची ७६ हजार हेक्टरमध्ये पेरणीसद्यस्थितीत कपाशीची सर्वाधिक ७६ हजार १५३ हेक्टरमध्ये पेरणी झाली. यामध्ये मोर्शी तालुक्यात २४ हजार २३३ हेक्टर, वरूड २३ हजार ९३६ हेक्टर, तिवसा ६३७५ हेक्टर, अंजनगाव सुर्जी ६०१२ हेक्टर, धामणगाव रेल्वे ५११० हेक्टर अमरावती ३८६५ हेक्टर, अचलपूर २९९९ हेक्टर, चांदूर रेल्वे १५०० हेक्टर, चिखलदरा ६९८ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर ६८९ हेक्टर, भातकुली ३३५ हेक्टर, धारणी १७५ हेक्टर, दर्यापूर १७५ हेक्टर व चांदूर बाजार तालुक्यात ५० हेक्टर असा एकूण १ लाख २६ हजार १०५ हेक्टरवर पेरा आहे.३१ हजार हेक्टर सोयाबीनची पेरणीसद्यस्थितीत सोयाबीनची ३१ हजार ६२३ हेक्टरमध्ये पेरणी झाली. यामध्ये तिवसा ८४९९ हेक्टर, मोर्शी ८४७८ हेक्टर, अमरावती ५५३० हेक्टर, धामणगाव रेल्वे ३४८५ हेक्टर, चांदूर रेल्वे २२०० हेक्टर, अंजनगाव सुर्जी ११२६ हेक्टर, चिखलदरा ७१९ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर ३६१ हेक्टर, वरूड ३१५ हेक्टर, धारणी २१५ हेक्टर, भातकुली २१० हेक्टर, दर्यापूर १४० हेक्टर, अचलपूर ३२४ हेक्टर व चांदूर बाजार तालुक्यात २० हेक्टर असे ३१ हजार ६२३ हेक्टर क्षेत्र आहे.

टॅग्स :agricultureशेती