शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

सकाळ जणू रखरखती दुपारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 22:04 IST

सध्या दिवसाच्या तापमानात वाढ झाली आहे. वातावरण बदलामुळे विषाणुजन्य तापाच्या रूग्णात वाढ झाली आहे. अंगाची काहिली करणाऱ्या या उन्हामुळे दुपारचे रस्ते ओस पडत आहे.

जितेंद्र दखने ।आॅनलाईन लोकमतअमरावती : सध्या दिवसाच्या तापमानात वाढ झाली आहे. वातावरण बदलामुळे विषाणुजन्य तापाच्या रूग्णात वाढ झाली आहे. अंगाची काहिली करणाऱ्या या उन्हामुळे दुपारचे रस्ते ओस पडत आहे. तापमानात आनखी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रूग्णालयात उषमागात कक्ष सुरू केलेला आहे.सध्या रबीचा हंगाम सुरू आहे. मात्र रखरखत्या उन्हामुळे शेतीकामाच्या वेळा बदलल्या आहेत. मजूरवर्ग दुपारऐवजी सकाळच्या सत्रातच कामे संपवीत आहेत. या रखरखत्या उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापतींनी शाळेची वेळ सकाळी करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. घराघरात कुलर सुरू झाले. या उन्हात अनेक शाळांमध्ये पंख्याची सुविधा नसताना वार्षिक परीक्षा सुरू असल्याने वाढत्या तापमानाचा फटका मुलांना बसत आहे. उन्हाचा तडाखा व त्यात अनेक ठिकानी पाइपलाइन फुटल्यामुळे होणारा दुषित पाण्याचा पुरवठा यामुळे आजारांनी डोके वर काढले आहे. विशेषत: लहान मुले व वृद्धांना याचा मोठा त्रास होत आहे. रूग्नालयातही वाढती गर्दी आहे. यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामानतज्ञांनी वर्तविली असल्याने काळजी घेणे महत्वाचे आहे.५६ पीएससीमध्ये उष्माघात कक्षयंदा मार्च महिन्यात उन्हाचे चटके अधिक जाणवत असल्याने आरोग्य विभागाने महिनाभरापूर्वी उन्हापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक पीएचसीत व जिल्हा सामान्य रूग्णालयात खबरदारीचा उपाय म्हणून उष्माघात क़क्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश असोले यांनी दिली.उपचाररुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर सुरू ठेवावे, रुग्णांचे तापमान कमी होण्यासाठी प्रयत्न करावे, कपाळावर थंड्या पान्याच्या पट्या ठेवाव्या.उष्माघातची कारणेउन्हामध्ये शेतात अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे, जास्त तापमानाच्या खोलीत कामे करणेकारखान्याच्या बॉयलर रूममध्ये काम करणे, काच कारखान्यात कामे करणे, घट्ट व गडद रंगाच्या कापडाचा वापर करणेउष्माघात टाळण्यासाठी घ्या काळजीप्रतिकारशक्ती चांगली असेल तर उष्माघाताचा धोका टळतो. त्यामुळे चांगला आहार घ्यावा. अधिक पाणी प्यावे, आहारात व्हिटॅमिन ‘सी’ असणाऱ्या फळांचा समावेश केला पाहिजे. यातून प्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होते.पाच वर्षाखालील मुले आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठांची प्रतिकारशक्ती कमी असते. यांना उष्माघाताचा धोका अधिक असतो. त्यामुळे उष्माघात टाळण्यासाठी मुले आणि ज्येष्ठांची अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे.उष्माघात टाळण्यासाठी १२ ते ३ या वेळेत बाहेर पडण्याचे टाळावे. सुती कपड्यांचा वापर करणे, बाहेर पडणे आवश्यक असल्यास रुमाल, टोपी, गॉगल्सचा वापर करावा. हलक्या प्रतीच्या गॉगलमुळे डोळ्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे असे गॉगल वापरण्याचे टाळावे.उन्हामुळे शरीरातील क्षार कमी होतात. अशक्तपणा, डोकेदुखी, सतत घाम येणे, उलट्या होणे, झटके येणे, खूप ताप येणे, बेशुद्ध पडणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत. अशा वेळी तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.उन्हामुळे थंड पदार्थाकडे ओढा वाढतो. परंतु दूषित पाण्यापासून बनलेल्या बर्फामुळे घसा खवखवतो. त्यातून पुढे आजार वाढू शकतो. त्यामुळे अशा बर्फाचा वापर असलेले पदार्थ टाळले पाहिजे.कामगारांनी दुपारच्यावेळी श्रमाची कामे टाळावीत. सकाळी आणि सायंकाळी काम करण्यास प्राधान्य द्यावे. शिवाय उन्हात काम करणाऱ्या कामगारांनी रुमाल, टोपीचा वापर करावा.उष्माघाताची लक्षणे दिसल्यावर अनेकदा घरगुती उपचार घेण्यावर भर दिला जातो. परंतु असे घरगुती उपचार करण्याचे टाळावे. लक्षणे दिसल्यावर तत्काळ वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वपूर्ण ठरते.चहा, कॉपी अल्कोहोलचा वापर टाळावा. शिळे अन्नपदार्थ आणि प्रतिनेयुक्त आहार टाळले पाहिजे. ओआरएस, घरगुती शीतपेय जसे लस्सी, लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा वापर करावा.- उष्माघाताच्या रुग्णांना वातानुकूलित खोलीत ठेवावे.लक्षणेथकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे,भूक न लागणे, चक्कर येणे, निरूत्साही होणे, डोके दुखणे, पोटऱ्यामध्ये वेदना होणे.मध्य भारतात ९.५ कि.मी. उंचीवर पश्चिमेकडून वाहणारे जेट वारे सक्रिय आहे. कोकणच्या ९०० मीटरवर चक्राकार वारे आहे. तीन दिवसांत तापमान ३ अंशांनी वाढणार आहे.- अनिल बंड, हवामान तज्ज्ञ