शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेणारे आॅटो रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 23:07 IST

अतिक्षमतेची प्रवासी वाहतूक करून नागरिकांच्या जीव धोक्यात टाकणाऱ्या आॅटोरिक्षाचालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. गेल्या आठवडाभरात पोलिसांनी जवळपास दीडशे आॅटोरिक्षांवर कारवाई केल्यामुळे चालकांचे धाबे दणाणले आहे.

ठळक मुद्देपोलिसांकडून कारवाईचा सपाटा : आॅटोरिक्षाचालकांचे धाबे दणाणले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अतिक्षमतेची प्रवासी वाहतूक करून नागरिकांच्या जीव धोक्यात टाकणाऱ्या आॅटोरिक्षाचालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. गेल्या आठवडाभरात पोलिसांनी जवळपास दीडशे आॅटोरिक्षांवर कारवाई केल्यामुळे चालकांचे धाबे दणाणले आहे.शहरातील अस्तव्यस्त व बेशिस्त वाहतुकीत भर टाकणारी आॅटोरिक्षा प्रवासी वाहतूक नागरिकांसाठी जीवघेणी ठरत असल्याचे आढळून आले आहे. गेल्या काही दिवसात अतिक्षमतेचे प्रवासी वाहतूक करणाºया आॅटोचे शहरात तीन ते चार अपघात झाले. अधिक पैसा कमावण्याच्या उद्देशाने तीन ते पाच प्रवासी बसविण्याऐवजी आठ ते दहा प्रवासी बसविण्याचे प्रकार शहरात सुरू होते. याकडे पोलीस यंत्रणेने दुर्लक्ष केले होते. पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण यांनी पोलीस ठाण्यांना अशा आॅटोरिक्षांवर कारवाईचे निर्देश दिले आहे. त्यानुसार पोलिसांनी आता क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या आॅटोरिक्षांवर कारवाईचा सपाटा सुरू केला. आठवडाभरात दररोज दहा ते पंधरा चालकांविरुध्द पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, धोकादायक वाहतूक करणाऱ्या १५० जणांवर कारवाई केली आहे.वाहतुकीस अडथळा करणाऱ्या दोनशेवर वाहनांवर कारवाईशहरातील अस्तव्यस्त वाहतुकीस कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी आता पोलिसांनी कंबर कसली आहे. रस्त्यावर वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा करण्याचे प्रकार शहरात मोठ्या प्रमाणात वाढले असून, अशा वाहनचालकांविरुद्ध फौजदारी कारवाईचा बडगा उगारला जात आहे. आठवड्याभरात पोलिसांनी दोनशेवर वाहन व हातगाडी चालकांविरुद्ध भादंविच्या कलम २८३ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.गॅस सिलिंडरच्या धोकादायक वापरावरही कारवाईशहरातील काही हॉटेल व हातगाड्यांवर गॅस सिलिंडरचा धोकादायक वापर होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येत आहे. याविषयी पोलिसांनी गंभीर दखल घेत कारवाई सुरू केली असून, दररोज शेकडो हॉटेल व हातगाडी चालकांविरुद्ध कारवाई केली जात आहे. त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २८५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात येत आहे.क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणाºया बेशिस्त आॅटोरिक्षांवर कारवाई सुरू आहे. याबाबत सर्व ठाणेदारांना निर्देश दिले आहेत.- प्रदीप चव्हाणपोलीस उपायुक्तक्षमतेपेक्षा अधिक प्रवासी आणणाºया ग्रामीण हद्दीतील आॅटोरिक्षांवर कारवाई सुरु आहे. आठवडाभरात दीडशे आॅटोरिक्षांवर कारवाई करण्यात आली.- रणजीत देसाई, एसीपी