शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

आधार कार्डवर जोशी प्रमाणपत्रावर मोरे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 23:18 IST

दर्यापुरातील एका लॉजवर बस्तान ठोकून हात, चेहेरा व छायाचित्र बघून भविष्य कथन करण्याचा दावा करीत सामान्य नागरिकांना आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या भोंदू ज्योतिषाचा भंंडाफोड गुरुवारी अंनिस व संभाजी ब्रिगेडने केला होता. हा जोतिषी बनावट नावाने वावरत असल्याचे उघडकीस आले.

ठळक मुद्देज्योतिषाचा कारनामा : नाव बदलून दर्यापुरात भोंदूगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : दर्यापुरातील एका लॉजवर बस्तान ठोकून हात, चेहेरा व छायाचित्र बघून भविष्य कथन करण्याचा दावा करीत सामान्य नागरिकांना आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या भोंदू ज्योतिषाचा भंंडाफोड गुरुवारी अंनिस व संभाजी ब्रिगेडने केला होता. हा जोतिषी बनावट नावाने वावरत असल्याचे उघडकीस आले. त्याच्याजवळील कागदपत्रे तपासल्यावर सदर जोतिषी चंद्रपूर भागातील असल्याचे निष्पन्न झाले आहे.अजय जोशी या नावाने व्यवसाय करीत असलेला हा भोंदू मूळचा अजय शंकरू मोरे आहे. त्याच्याजवळील कागदपत्रांवरून ही बाब स्पष्ट झाली आहे. सदर ज्योतिषाने दर्यापुरातील लॉजवर मुक्काम करून ज्योतिषाचार्य व फलज्योतिषी असल्याबाबत पत्रके शहरात वाटली होती.विशेष म्हणजे, या ज्योतिषाने दर्यापूर शहरात दुसºयांदा एन्ट्री केली आहे. यापूर्वीही अनेकांनी संपर्क साधत आपल्या जीवनातील अडचणी सोडविण्यासाठी भोंदूकडून उपाय घेतले होते. हा ज्योतिषी पैसे घेऊन ग्रहदोष, बाधा, संतानयोग, पितृदोष, महादशा आदी उपाय व उपचार देण्याचे आमिष देत असे. त्या आशयाची पत्रकेही वाटली होती व ग्राहकांना आकर्षित केले होते. या ज्योतिषीने शहरात २५ जानेवारीपासून येऊन आपला व्यवसाय थाटला होता. त्याला भेटण्यासाठी शहरातील तब्बल ३० ते ३५ लोकांनी भाग घेतला होताविशेष म्हणजे, हा ज्योतिष्य कम्प्युटर काळजी कुंडली काढूनसुद्धा देण्याचे सांगत होता. मात्र, यावर आक्षेप घेत गुरुवारी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व संभाजी ब्रिगेडने पोलिसांत कारवाईची मागणी केली होती. यावर पोलिसांनी पाचारण करीत ज्योतिषाची झाडाझडती घेतली होती. यावर माफी मागून शहरातून पोबारा केला होता. नाव बदलून ग्राहकांना फसविणाºया भोंदू जोतिष्याचा निषेध करीत नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, विशिष्ट समाजाचे नाव वापरून बदनाम करण्याच्या षड्यंत्राला लगाम लावण्याची मागणी केली आहे.अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोण्या धर्माच्या किंवा सण परंपरांच्या विरोधात नाही; मात्र धर्माच्या नावावर नागरिकांच्या श्रद्धांचा व्यापार करणाऱ्या भोंदूंविरोधात जोरकसपणे मैदानात उतरली आहे. दर्यापुरात आढळून आलेला ज्योतिषी हा मूळ नाव बदलून भोळ्या लोकांची आर्थिक लुबाडणूक करीत होता. अर्थात या विषयाचा विज्ञानाशी कुठलाही संबंध नाही. सामान्य नागरिकांनी यापासून सावध राहावे.- शेखर रेखेजिल्हा संघटक, अंनिस