शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
2
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
3
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
4
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
5
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
6
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
7
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगे-पाटील ७ वाजता पत्रकार परिषद घेणार
8
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
9
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
10
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार
11
पीएम मोदींना शिवीगाळ! अमित शाह म्हणाले- 'तुम्ही जितक्या शिव्या द्याल, तितके कमळ फुलेल...'
12
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा टीझर प्रदर्शित, वरुण धवन दिसला बाहुबली अवतारात
13
मुलीने बॉयफ्रेंडशी लग्नाचा तगादा लावला, बापाने लेकीचा आवाज बंद केला; मृतदेह लटकवून वेगळाच बनाव रचला 
14
ट्रम्प टॅरिफच्या संकटातही भारताची आर्थिक गाडी सुस्साट! GDP च्या वाढीत चीनलाही टाकलं मागे
15
पंक्चरचं दुकान अन् व्यवसायानं ड्रायव्हर; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणारा तो' कोण?
16
नारळ पाणी प्यायल्याने खरंच कमी होतं का वजन? डॉक्टरांनीच सांगितलं 'हे' सत्य
17
सुवर्णसंधी! एनएचपीसीमध्ये विविध पदांसाठी भरती; २ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात
18
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५ वर्षांत मिळवा ५ लाख रुपये व्याज! मुलांच्या नावावरही करू शकता गुंतवणूक
19
Video: दोन सिंहांमध्ये जुंपली... तुफान भांडण, एकमेकांवर हल्ले... पाहा कोण कुणावर भारी?
20
Ganpati Visarjan 2025: बाप्पाचे विसर्जन करताना जगबुडी नदीचे पाणी वाढले अन् तिघे गेले वाहून

अचलपूरमध्ये १५० हून अधिक कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:13 IST

अनिल कडू परतवाडा : अचलपूर नगर पालिका क्षेत्रासह तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा उदे्रक बघायला मिळत आहे. यात अवघ्या आठ ...

अनिल कडू

परतवाडा : अचलपूर नगर पालिका क्षेत्रासह तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा उदे्रक बघायला मिळत आहे. यात अवघ्या आठ दिवसात कोरोना रुग्णांची संख्या दीडशेच्यावर गेली आहे. त्यात अचलपूर परतवाडा शहरातील शंभरवर रुग्ण आहेत. या व्यतीरिक्त अनेक रुग्ण घरीच असून त्यांची नोंद सरकारी यंत्रणेकडे नाही.

आठ दिवसांपासून अचलपूर कुटीर रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड रुग्णालय हाऊसफूल आहे. तेथे एकही बेड रिकामा नाही. तेथील ३५ बेड फुल्ल असल्यामुळे अनेक रुग्णांना चार दिवसांपासून अमरावतीला पाठविण्यात येत आहे. यातील काही कोरोना रुग्ण अमरावतीला उपचारार्थ दाखल न होता घरीच कुटुंबासोबत आहेत. अचलपूर कोविड रुग्णालयातील बेड रिकामा होण्याची ते वाट बघत आहेत. अचलपूरमध्ये कोविड रुग्णांकरीता उपलब्ध असलेली व्यवस्था अपुरी पडत आहे. वाढती रुग्णसंख्या बघता अचलपूर ट्रामाकेअर युनिटमधील १५ बेड कसे उपलब्ध करून देता येतील, या अनुषंगाने आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहे. सोमवारपासून ट्रामा केअरमधील बेड रुग्णांकरिता खुले करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

शहर हॉटस्पॉट

अचलपूर परतवाडा शहर तर कोरोनाच्या अनुषंगाने हॉटस्पॉट ठरले आहे. ८ फेब्रुवारीला ३७, ९ फेब्रुवारीला २१, १० रोजी ५२, ११ रोजी २४, तर १२ फेब्रुवाी रोजी १६ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यात ९ फेब्रुवारीला कांडली येथील ८० वर्षीय पुरुष रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. चावलमंडी, अभिनव कॉलनी, बिलनपूरा, जीवनपूरा, सिव्हीललाईन, मुगलाई, गोपालनगर, विद्यानिकेतन कॉलनी, ब्राम्हणसभा, खापर्डे प्लॉट, मिश्रालाईन गोधनविहार, संतोषनगर, सायमा कॉलनी, फॉरेस्ट डेपो, गुरुनानकनगर, गणेशनगर लालपूलसह अन्य भागांत हे कोरोना रुग्ण पसरले आहेत. शहरातील फातिमा कॉन्व्हेंटमधील शिक्षक कोरोना संक्रमित निघाल्यामुळे, खबरदारीची उपाययोजना म्हणून सात दिवसांकरिता फातिमा कॉन्व्हेंट बंद ठेवण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापनाने घेतला आहे.

ग्रामीण भागातही संख्या वाढतीच

ग्रामीण भागातील कांडली, देवमाळी, पथ्रोट, नारायणपूर, वडगाव फत्तेपूर, उपतखेडा, गौरखेडाकुंभी, नवसारी, जवर्डी, रामापूर, रासेगाव, परसापूर, खानजमानगरसह तालुक्यात कमीअधिक प्रमाणात हे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत.

कोट :

अचलपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. डेडिकेटेड कोविड रुग्णालयात बेड शिल्लक नाहीत. नागरिकांनी कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. डेडिकेटेड कोविड रुग्णालयातील या ३५ बेड व्यतिरिक्त ट्रामाकेअरमधील १५ बेड कोरोना रुग्णांकरिता उपलब्ध करुन देण्याबाबत नियोजन सुरू आहे.

- डॉ.जाकिर,

डेडिकेटेड कोविड रुग्णालय, अचलपूर