शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पावसाळ्यात २० गावांचा तुटतो संपर्क, ३३ गावे संपर्कक्षेत्राबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 23:17 IST

पावसाळ्यात मेळघाटातील जवळपास २० गावांचा संपर्क तुटतो, तर ३३ गावे आजही बारमाही संपर्कक्षेत्राबाहेर आहेत. १ जुलैपासून परतवाडा आगाराची हतरूला जाणारी बस रस्ता नादुरुस्त असल्याने चार महिन्यांसाठी बंद करण्यात आली. अतिदुर्गम भागात आजही समस्या कायम आहेत. त्यामुळे पावसाळ्यात प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे

ठळक मुद्देमेळघाट अलर्ट : हतरूला जाणारी बसफेरी चार महिन्यांसाठी बंद

नरेंद्र जावरे।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : पावसाळ्यात मेळघाटातील जवळपास २० गावांचा संपर्क तुटतो, तर ३३ गावे आजही बारमाही संपर्कक्षेत्राबाहेर आहेत. १ जुलैपासून परतवाडा आगाराची हतरूला जाणारी बस रस्ता नादुरुस्त असल्याने चार महिन्यांसाठी बंद करण्यात आली. अतिदुर्गम भागात आजही समस्या कायम आहेत. त्यामुळे पावसाळ्यात प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहेमेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात १९९३ च्या कुपोषणानंतर कोट्यवधीच्या योजनांचा पाऊस पाडण्यात आला. परंतु वीज, पाणी, रस्ता, आरोग्य, शिक्षण या पायाभूत गरजा अजूनही सर्व गावांत पोहोचल्यास नसल्याचे वास्तव आहे. संपर्काअभावी मेळघाटात बालमृत्यूचे भयावह प्रमाण केव्हाही उद्भवू शकते. दळणवळणाची साधने नसल्याने आदिवासींपर्यंत आरोग्यसेवा पोहोचू शकत नसून, आजारी रुग्णाला शहराच्या ठिकाणी आणावे कसे, हा प्रश्न अजूनही कायम आहे.संपर्क तुटणाऱ्या गावात औषध, पोषणसाठाधारणी व चिखलदरा तालुक्यात संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये आरोग्य विभाग आणि बाल विकास प्रकल्प कार्यालयातर्फे अंगणवाडी केंद्रात पोषण आहार साठा आॅक्टोबर महिन्यापर्यंत पुरेल एवढा ठेवण्यात आला असल्याचे चिखलदरा येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाचे विस्तार अधिकारी योगेश वानखेडे यांनी सांगितले. औषध पुरवठा चार महिने पुरेल एवढा ठेवण्यात आला आहे. कुपोषित बालके, आजारी रुग्णांसाठी गावातच व्यवस्था करण्यात आली. मात्र, गंभीर रुग्णांचे काय, हा प्रश्न अनुत्तरित आहे.बसफेरी १ जुलैपासून बंदपरतवाडा आगारातून अतिदुर्गम हतरुला जाणारी परतवाडा आगाराची बसफेरी १ जुलैपासून चार महिन्यांसाठी बंद करण्यात आली आहे. सदर रस्ता पूर्णत: नादुरुस्त असून, नवीन रस्त्याचे काम सुरू असल्याचे पत्र पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता आय.आय. खान यांनी उपविभागीय अधिकारी, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत, परतवाडा आगार आदी सर्व विभागांना दिले. या रस्त्यावर असलेल्या गावांमध्ये ये-जा करण्यासाठी पर्यायी रस्ता नसताना वाहतूक बंद करण्याचे दिलेले पत्र संताप व्यक्त करणारे ठरले आहे.लोकसभा निवडणुकीत वॉकीटॉकीचा वापरपावसाळ्यात नदी-नाल्यांना पुराण्या सोबत रस्ता नादुरूस्त असल्यामुळे पंधरापेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटतो आरोग्य विभाग व बालविकास विभागाने संपर्क तुटणाऱ्या चिखलदरा तालुक्यातील रेहट्याखेडा, राक्षा, आढावा बिच्छूखेडा, माडीझडप, मारिता, डोमी कुही खुटीदा, सुमिता, टेंभ्रू बोरदा ,बोदु, पिपल्या, पांढराखडक, नवलगांव, पिपादरी, सलिता, लाखेवाडा, आदी गावे असून धारणी तालुक्यातील परसोली, कुंड,खामदा या बैरागड व बिजुधावडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील गावांचा समावेश आहे,तर चिखलदरा तालुक्यातील ३३ गावांमध्ये संभाषणासाठी कुठल्याच प्रकारे मोबाईलची रेंज नसल्याने बारमाही संपर्क क्षेत्राबाहेरील आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या गावांसाठी वनविभागाच्या मदतीने वायरलेस यंत्रणा व वाकी टॉकी चा उपयोग जिल्हा प्रशासनाने केला होता.पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये आरोग्य सेवक चार महिन्यांसाठी मुक्कामाला राहतील.- सतीश प्रधान, तालुका वैद्यकीय अधिकारी, चिखलदरा