शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

५५ वर्षांत १२ वेळा मान्सून ‘लेटलतीफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 22:39 IST

अलीकडच्या पाच वर्षांत पाऊस लहरी झालेला आहे. किंबहुना गत ५५ वर्षांचा आढावा घेता मान्सूनच्या आगमनात विविधता आढळते. या कालावधीत मान्सून तब्बल १२ वेळा नियमित कालावधीपेक्षा उशिरा आलेला आहे.

ठळक मुद्देनऊ वेळा जून कोरडा : पुनर्वसूच्या बेडकानेच पेरणीला तारले

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अलीकडच्या पाच वर्षांत पाऊस लहरी झालेला आहे. किंबहुना गत ५५ वर्षांचा आढावा घेता मान्सूनच्या आगमनात विविधता आढळते. या कालावधीत मान्सून तब्बल १२ वेळा नियमित कालावधीपेक्षा उशिरा आलेला आहे. विशेष म्हणजे या पाच दशकांत नऊ वेळा जून कोरडा गेल्याने शेतकऱ्यांवर अरिष्ट कोसळले. या पार्श्वभूमीवर यंदा जुलैच्या दुसºया आठवड्यात होणारे मान्सूनचे आगमन हे उशिराच गणल्या जाते. मात्र, पुनर्वसूच्या बेडकाने शेतकऱ्यांना तारले आहे.जिल्ह्यासह विदर्भात साधारणपणे जूनच्या ७ ते १० तारखेच्या दरम्यान मान्सूनची सुरूवात होते. ७ जूनला मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यावर पेरणीची लगबग सुरू होते. २५ जूननंतर पेरण्या आटोपतात. परंतु, मागील पाच वर्षांचा आढावा घेता मान्सूनचे आगमनच उशिरा झाले. ५५ वर्षांत ५ जून १९९० मध्ये सर्वात आधी मान्सूनची नोंद झाली, तर सन २००२ मध्ये २७ जुलैला आलेला मान्सून हा सर्वात उशिरा ठरला आहे. तब्बल १२ वर्षे मान्सूनचे आगमन हे जुलै महिन्यात झालेले आहे. ३८ वर्षे मान्सूनचे ५ ते ३० जून महिन्यात आगमन झाले.यंदा हवामान विभागाने सरासरीच्या इतपत पावसाचे भाकित केले. प्रत्यक्षात रोहिणी कोरडे गेल्याने शेतकºयांची पेरणीपूर्व मशागतच झालीच नाही. त्यासाठी मृग उजाडले. मृगाच्या मेंढ्याचा पाऊस अधूनमधून पडल्याने मशागतीची लगबग वाढली व २२ जूनपासून आर्द्रा नक्षत्राला सुरूवात झाली. यामध्येदेखील अधूनमधून पाऊस झाल्याने शेतकºयांच्या पेरण्या साधल्या गेल्या. किंबहुना यंदा मान्सूनचे आगमन १४ ते १५ जुलैदरम्यान होत आहे. त्यामुळे निसर्ग भाकितांना दाद देत नाही, हेच वास्तव आहे.आर्द्रा, पुनर्वसूवरच मदारयंदाच्या पावसाळ्यात ७ जूनपासून सुरू झालेले मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकºयांची मदार २२ जूनपासून लागणाºया आर्द्रा नक्षत्रावर होती व या नक्षत्राचा हत्ती देखील अधूनमधून पाण्यात डुंबला. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना मोड आली नाही. मात्र, भुजलातही वाढ झालेली नाही. या पार्श्वभूमीवर ६ जुलैपासून सुरू झालेल्या पुनर्वसू नक्षत्रात खºया अर्थाने मान्सूनचे दमदार आगमन होत असल्याने पुनर्वसूचा बेडूक पाण्यात डुंबणार आहे.२४ तासात सार्वत्रिक पाऊसगेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २६.२८ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक ५२ मिमी पाऊस चिखलदरा तालुक्यात पडला. धामणगाव रेल्वे ४१, अमरावती १६.१२, भातकुली २४.७०, नांदगाव खंडेश्वर २५, चांदूर रेल्वे २९.०४, तिवसा २७.४४, मोर्शी २०.८०, अचलपूर ४.९७, चांदूर बाजार २३, दर्यापूर २१.८५, अंजनगाव सुर्जी २७.७०, धारणी ८.४५ व वरूड तालुक्यात ४५.१० मिमी पावसाची नोंद झाली.