शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'कॉमन बर्ड'वर मॉनिटरिंग

By admin | Updated: January 11, 2016 00:07 IST

चिमणी, कावळा, भोरीसारख्या 'कॉमन बर्ड'च्या आजपर्यंत नोंदी घेण्यात आल्या नाहीत. मात्र, आता 'कॉमन बर्ड'ची शास्त्रीय पध्दतीने नोंदी घेण्याचा उपक्रम...

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचा उपक्रम : वेक्स संस्थेचा पुढाकारवैभव बाबरेकर अमरावतीचिमणी, कावळा, भोरीसारख्या 'कॉमन बर्ड'च्या आजपर्यंत नोंदी घेण्यात आल्या नाहीत. मात्र, आता 'कॉमन बर्ड'ची शास्त्रीय पध्दतीने नोंदी घेण्याचा उपक्रम मुंबई येथील बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने हाती घेतला आहे. यामध्ये जिल्ह्यातील कॉमन बर्डच्या नोंदी करण्यासाठी वाईल्डलाईफ अ‍ॅन्ड एन्हायर्नमेंट सोसायटीने पुढाकार घेतला आहे. देशभरातील वन्यप्रेमी व पक्षीप्रेमी विविध प्रजातीच्या पक्ष्यांवर अभ्यास करीत आहेत. मात्र, आजपर्यंत सामान्य पक्षांच्या शास्त्रीय पध्दतीने नोंदी घेतल्या जात नव्हती. त्यामुळे या पक्ष्यांची निश्चित संख्या माहिती होत नव्हती. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने कॉमन बर्ड मॉनिटरिंग कार्यक्रम भारतभर राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या वर्षांपासून कॉमन बर्ड मॉनिटरींगला सुरुवात झाली असून अमरावती जिल्ह्यात हा कार्यक्रम वाईल्डलाईफ अ‍ॅन्ड एन्हायर्नमेंट सोसायटीने हाती घेतला आहे. हा कार्यक्रम जिल्ह्यातील सात ग्रिडमध्ये राबविल्या जात असून प्रत्येक ऋतूमध्ये पक्षांच्या नोंदी घेण्यात येणार आहेत. हिवाळ्यात सामान्यत: पक्षी अभ्यास कार्यक्रम १० जानेवारी रोजीच्या सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत राबविण्यात आला आहे. यासाठी मुंबईच्या बीएनएचएसचे नंदकिशोर दुधे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. समन्वयक व वेक्सचे सचिव जयंत वडतकर यांनी सहभागी पक्षी अभ्यासकांना सामान्य पक्ष्यांच्या प्रजातीबाबत माहिती दिली. प्रत्येक ग्रीडवर २ ते ३ अभ्यासकांनी सामान्य पक्ष्यांच्या नोंदी केल्या आहेत. यावेळी पक्षी अभ्यासक किरण मोरे, गजानन वाघ निनाद अभंग, गौरव कडू, सौरभ जवजांळ, विशाल गवळी, अभिजीत साबळे, शुभम वाघ, प्रथमेश तिवारी, प्रतुल गोगटे, अल्केश ठाकरे आदि सहभागी होते. यादरम्यान जवळपास १०० पेक्षा अधिक प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद घेण्यात आल्याची माहिती किरण मोरे यांनी दिली.