शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या १० योजनांवर सचिवस्तर समितीचे मॉनिटरिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 16:34 IST

राज्य शासनाच्या १० महत्त्वाकांक्षी योजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या जिल्हानिहाय दौरे करीत आहेत. या दौऱ्यापश्चात फलनिष्पत्तीसाठी मंत्रालयातील सचिवस्तर समितीद्वारा याचा पाठपुरावा केला जाणार आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या सचिवालयाचे निर्देश फलनिष्पत्तीसाठी सहा महिने करणार पाठपुरावा

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य शासनाच्या १० महत्त्वाकांक्षी योजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या जिल्हानिहाय दौरे करीत आहेत. या दौऱ्यापश्चात फलनिष्पत्तीसाठी मंत्रालयातील सचिवस्तर समितीद्वारा याचा पाठपुरावा केला जाणार आहे. यासाठी विभागनिहाय समिती गठित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांनी दिले आहेत.सर्वसामान्य नागरिकांशी निगडित असलेल्या राज्य शासनाच्या १० महत्त्वाकांक्षी योजनेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री ३ आॅक्टोबरपासून जिल्हा दौरे करीत आहेत. गत चार दिवसांत औरंगाबाद, अमरावती व बुलडाणा या जिल्ह्याचा दौरा त्यांनी केला. यामध्ये प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, प्रधानमंत्री शहर आवास योजना, नगरोत्थान व अमृत योजना, जलयुक्त शिवार, महानरेगा, धडक विहीर योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पेय जल योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास व मुद्रा योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, दलीत वस्ती सुधार योजना, ठक्कर बाप्पा योजना, बळीराजा योजना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, जिल्ह्यातील व महापालिका क्षेत्रातील दोन वैशिष्टपूर्ण पथदर्शक प्रकल्प तसेच संबंधित जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेत आहे. या बैठकीत योजनाच्या अंमलबजावणीत माघारलेल्या तीन तालुक्यांना व पोलीस स्टेशननिहाय आढावा मध्ये सर्वात कमी कामगिरी असणाºया चार ठाणेदारांना थेट मुख्यमंत्र्यासमक्ष स्पष्टीकरण द्यावे लागत आहे.मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर या १० योजनांसाठी असलेली समिती पुढीळ सहा महिने आढावा घेणार आहे. कोकण विभाग समितीमध्ये नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव, वित्त सचिव, जलसंधारण विभागाचे सचिव, मजीप्राचे सदस्य सचिव यांचा समावेश आहे. पुणे विभागासाठी गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव, सामाजिक न्याय विभागाचे सचिव, ग्रामविकास विभागाचे सचिव व मेडाचे संचालकांचा समावेश आहे. नाशिक विभागासाठी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव, जलसंपदाचे प्रधान सचिव, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, व सामाजिक न्याय विभागाचे आयुक्तांचा समावेश आहे.मराठवाडा व विदर्भाकरीता असलेली समिती* औरंगाबाद विभागाकरीता पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव, वित्त विभागाचे प्रधान सचिव, मुमंग्रासयोचे सचिव व पशुसंवर्धन आयक्तांचा समावेश असलेली समिती आढावा घेणार आहे.* नागपूर विभागाकरीता महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव, तसेच मनरेगा चे आयुक्तांचा समितीत समावेश आहे.* अमरावती विभागाकरीता वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव, नगरविकासचे प्रधान सचिव, जलसंपदाचे प्रदान सचिव, कृषी आयुक्त व तंत्रशिक्षण संचालकांची समिती आढावा घेणार आहे.

टॅग्स :Governmentसरकार