अमरावती : जिल्ह्यात सोमवारी ६७३ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या ३०,११७ झाली आहे. २४ तासांत उपाचारादरम्यान दोन रुग्णांचा मृत्यू झाला. संक्रमितांच्या मृत्युसंख्या ४६५ झाली आहे.
सोमवारी २,२६० नमुन्यांची तपासणी केली असता, ६७३ पॉझिटिव्हची नोंद झाली. ही टक्केवारी २९.७७ आहे. सद्यस्थितीत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ३,७९८ एवढी असली तरी रुग्णालयात ९९७ उपचारार्थ दाखल आहेत व अन्य रुग्णांनी होम आयसोलेशन सुविधेचा लाभ घेतला आहे. रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने तीन महिन्यांत पहिल्यांदा रिकव्हरी रेट कमी झालेला आहे. सध्या हे प्रमाण ८७.४२ टक्के आहे. सोमवारी २१९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
कोरोनाचा संसर्ग वाढता असल्याने अमरावती, अचलपूर शहर व लगतच्या परिसरात कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले व याठिकाणी १ मार्चपर्यत कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यात या चार दिवसांत चाचण्यांची संख्याही वाढविण्यात आली आहे.
बॉक्स
सोमवारी दोन रुग्णांचा मृत्यू
००००००००००
००००००००००००००००