शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
2
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
3
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
4
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
5
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
6
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
7
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
8
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
9
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
10
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
11
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
12
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
13
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
14
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
15
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
16
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
17
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
18
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
19
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
20
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट

'त्या' क्षणाने केले प्रथमेशला मृत्युंजय

By admin | Updated: August 17, 2016 23:55 IST

दिवस नागपंचमीचा. शासकीय सुटीचा. अर्थात् शाळा, वसतिगृह आणि आश्रम परिसरात शुकशुकाट. त्याच सकाळी प्रथमेशचा गळा कापला गेला.

धारदार ब्लेड : हरविलेला कंचा अन् शोधणारा मुलगा, ‘असुरां’नी फेकले भावनिक जाळेअमरावती : दिवस नागपंचमीचा. शासकीय सुटीचा. अर्थात् शाळा, वसतिगृह आणि आश्रम परिसरात शुकशुकाट. त्याच सकाळी प्रथमेशचा गळा कापला गेला. पूर्वनियोजितरित्या गुन्हा आकारबद्ध होत होता; पण अनपेक्षितपणे आश्चर्य घडावे तसा एक क्षण चमला नि प्रथमेश ‘मृत्युंजय’ ठरला. आॅगस्ट महिन्याची सात तारीख. वार रविवार. वसतिगृहातील काही मुले आदल्या दिवशीच सणानिमित्त गावी गेली होती. वसतिगृहात असलेली मुले गावी जाण्याच्या तयारीत होती. सकाळी साडेआठच्या सुमारास न्याहारी आटोपली. काही मुले आश्रम परिसरात खेळत होती. तत्पूर्वी आश्रम परिसरातच नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत भयंकर घडत होते. आईवडीलांच्या भेटीला आतुर झालेला प्रथमेश ‘असुरां’च्या नजरेत भरला होता. त्याचे मुंडके उडवायचे, हे ठरलेलेच होते. आईवडीलांसोबत बोलणे करून देतो, असे सांगून प्रथमेशला भावनिकदृष्ट्या स्वत:त गुंतविण्यात राक्षसी प्रवृत्तीचे हे लोक यशस्वी झाले होते. पाचवीतील मुलाचे मन चंचल. त्याचा लोभही इवलासा. गळा कापण्याचा दृढ निश्चय करणाऱ्यांनी त्याला चॉकलेट दिले. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत वरच्या माळ्यावर सोबत नेले. सुरेंद्र मराठेने सोबत धारदार ब्लेड घेतले होते. मोबाईलवर आईबाबांशी बोलणे होणार या आनंदाने मनात उकळ्या फुटलेल्या प्रथमेशचा आनंदी चेहरा मागून अचानक करकचून धरण्यात आला. तो राक्षसी पंजा नीलेश ऊकेचा होता. नीलेशने प्रथमेशला छातीशी घट्ट पकडले. प्रथमेशने केला गळा झाकण्याचा प्रयत्नअमरावती : एक हात प्रथमेशच्या चेहऱ्यावर आणि दुसरा छातीवर होता. गळा मोकळा ठेवण्यात आला. अल्पवयीन आरोपीने प्रथमेशचे पाय गच्च पकडून धरले. कसायाच्या रूपात असलेल्या सुरेंद्रने त्याच्या हातच्या धारदार ब्लेडने सुकोमल प्रथमेशच्या गळ्यावरून चर्रर्रऽऽऽ ब्लेड फिरविली. रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या. प्रथमेशची जिवेष्मा कार्यरत झाली. सर्व शक्ती एकत्रित करून त्याने प्रतिकार केला. सुरेंद्र दुसरा वार करणार तोच प्रथमेशने उजव्या हाताने गळा झाकण्याचा प्रयत्न केला. प्रथमेशच्या उजव्या पंजाचा अंगठा आणि तर्जनी कापली गेली. जल्लादांची शारीरिक ताकद प्रभावी ठरली. प्रथमेशवर पुन्हा दुसरा वार करण्यात आला. पुन्हा गळा चिरला गेला. ब्लेड आणखी तिसऱ्यांदा गळ्यावरून सफाईने फिरविले गेले. प्रथमेश रक्ताने न्हाऊन निघाला. त्याचा प्रतिकार क्षीण होत गेला. तो निपचित पडला. त्याला आडवे झोपविले गेले. त्याच्या शरीरातून भळाभळा वाहणाऱ्या रक्ताने सुरेंद्रने स्वत:चे सर्वांग माखले. सुरेंद्रचे कपडेही प्रथमेशच्या रक्ताने ओले झाले होते. प्रथमेश मृत पावला. या पक्क्या मानसिकतेतून नियोजनानुसार त्याला खालच्या माळ्यावर आणून ठेवण्यात आले. सारेच आरोपी गाफिल असताना एक अनपेक्षित क्षण चमकला. मुर्च्छितावस्थेतील प्रथमेशला अचानक चेतना आली. तो जागी झाला. त्याच्या बाहुंची हालचाल झाली. तो खाली पायऱ्यांवर कोसळला. नेमका इतक्यात कंचा हरविला म्हणून शोधत आलेल्या एका विद्यार्थ्याला प्रथमेश रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला दिसला. त्याने ओरडून ओरडून वार्ता कर्णोपकर्णी पोहचविली. आता प्रकरण दबणे शक्य नव्हते. आश्रम परिसरातील लोकांनी प्रथमेशला इलाजासाठी हलविले. ती अनपेक्षित चेतना आणि हरविलेला कंचा प्रथमेशला मृत्युंजय करवून गेले. अव्याहत, कौशल्यपूर्ण तपास पोलीस उपअधीक्षक श्रीनिवास घाडगे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत या नरबळी प्रकरणाचा तपास सुरू आहे. अटक करण्यात आलेले आरोपी आणि त्यांनी कबुल केलेला गुन्हा घाडगेंच्या अव्याहत आणि कौशल्यपूर्ण तपासाचा परिपाक होय. या घटनेत याहीपलिकडे बरेचकाही दडले असल्याची लोकभावना आहे. श्रीनिवास घाडगे ती तत्थेही हुडकून काढतीलच. अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली कुठे?निरागस प्रथमेशचा नरबळी देण्यासाठी कोंबडीचा चिरावा तसा गळा चिरल्याचे भयंकर वास्तव उघड झाले. विदर्भाची सांस्कृतिक राजधानी शहारली. थरारली. प्रथमेशच्या न्यायासाठी लोक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले. सामाजिक संघटना, राजकीय पक्षही सरसावले. सर्वांची मागणी एकच- प्रथमेशच्या नरबळी प्रकरणातील मुख्य आरोपींना गजाआड घाला. पिंपळखुट्याच्या आश्रमाचे सर्वेसर्वा शंकर महारांजांना अटक करा. या मागण्यांसाठी एकत्र आलेल्या सर्वांनाच मात्र एक प्रश्न भेडसावत होता. कुठे गेली अंधश्रद्धा निर्मूलन समिती? दहा दिवस जिल्हा धगधगतोय; पण कार्यक्रमांसाठी अमरावतीवर लोभ दाखविणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीला या अत्यंत गंभीर मुद्यावर कुठलीही भूमिका घ्यावीशी वाटू नये ?ही समिती असल्या प्रकारात जाणकार आहे, अशी लोकभावना आहे. अशी अनेक प्रकरणे या समितीने हाताळली आहेत. पिंपळखुट्याच्या आश्रमात नेमके काय चालते? शंकर महाराजांकडे असलेल्या शक्तीचे नेमके गमक कोणते? उद्देश काय? नरबळी महाराजांच्या आदेशानुसार देण्याचा प्रयत्न झाला काय? आश्रमाची इतकी प्रॉपर्टी कशासाठी? आदी प्रश्नांची उत्तरे सामान्याजनांना हवी आहेत. त्यासाठी ते संताप व्यक्त करीत आहेत. श्याम मानवांनी मनावर घेतल्यास या तमाम मुद्यांचा उहापोह केला जाऊ शकेल. ही समिती आश्रमाचा अभ्यास करू शकेल. नेमकी तत्थ्ये हुडकली जातील. सत्य-असत्य दोन्ही बाजू स्पष्टपणे त्यामुळे लोकदरबारात सादर होऊ शकतील. अंधश्रद्धेला लोकांनी बळी पडू नये यासाठी अव्याहत जागर करणाऱ्या समितीने, आता लोक अंधश्रद्धेविरुद्ध उठाव करीत असताना मजबुतीने साथ नको का द्यायला?