शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

"आई, तुझ्या कुशीत विसावा घ्याचा आहे गं!" तरूणीचा गळफास, घरात आढळला मृतदेह

By प्रदीप भाकरे | Updated: January 30, 2023 23:44 IST

सुसाईड नोटवरील तारिख पाहता तिने २७ जानेवारी रोजी गळफास घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. योगिता अशोक जवंजाळ (२३) असे मृत तरूणीचे नाव आहे.

अमरावती : आई, जीवनाला कंटाळले गं, आता तुझ्याकडेच यायचे आहे, केवळ तुझाच सहारा आहे, तुझ्या कुशीत विसावण्यासाठी तुझ्याकडे येत असल्याचे लिहून ठेवत एका २३ वर्षीय तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी दुपारी गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आशियाड कॉलनीस्थित एका घरात हा प्रकार उघड. 

सुसाईड नोटवरील तारिख पाहता तिने २७ जानेवारी रोजी गळफास घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. योगिता अशोक जवंजाळ (२३) असे मृत तरूणीचे नाव आहे.

पोलीस सुत्रानुसार, परिसरातील एका घरातून दुर्गंधी येत असल्याने काहींनी त्या दिशेने धाव घेतली असता, ती दुर्गंधी जवंजाळ नामक मुलीच्या घरातून येत असल्याचे स्पष्ट झाले. ती माहिती गाडगेनगर पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार आसाराम चोरमले दुपारी तीनच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले असता, त्या घरात एका तरूणीचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. तिची ओळख योगिता अशोक जवंजाळ (२३) अशी पटविण्यात आली. पोलिसांना पंचनाम्यादरम्यान घटनास्थळाहून सुसाईड नोट मिळाली. त्यानुसार, तिने जीवनाला व एकाकीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे.आईवडीलांविना पोरकी -पोलिसांनुसार, योगिता हिच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे. तिला एक भाऊ असून तो नोकरीसाठी पुणे येथे वास्तव्यास आहे. त्यामुळे योगिता ही घरी एकटीच राहत होती. तिच्या आईचे सन २०१६ मध्ये, तर वडिलांचे त्यानंतर निधन झाले. भाऊ पुण्याला राहत असल्याने ती एकाकी जगत होती. दरम्यान, २७ जानेवारी रोजी योगिता हिने राहत्या घरी पंख्याला ओढणी बांधून गळफास लावला. घटनेनंतर तीन दिवस हा प्रकार कुणाच्याही लक्षात आला नाही.भावनिक पत्र -दरम्यान, रविवारी योगिता हिच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आल्यावर तिच्या नातेवाईकाला बोलाविण्यात आले. आवाज दिल्यावर आतून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. आत्महत्या करून तीन दिवस लोटल्याने तिचा मृतदेह कुजला होता. पंचनाम्यादरम्यान पोलिसांना योगिता हिने आत्महत्येपूर्वी मृत आईच्या नावे लिहिलेले भावनिक पत्र आढळून आले. 'आई, शेवटी मी तुझ्याजवळ येत आहे. मला तुझ्या पदरात घे, आईची माया दे, असे योगिता हिने या पत्रात लिहिले. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मृताच्या भावाला त्याबाबत माहिती देण्यात आली. 

टॅग्स :Amravatiअमरावती