शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

‘मॉडर्न गर्ल’च्या नादात ‘तो’ झाला नादार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 23:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मॉडेलसारख्या राहणाऱ्या एका तरुणीने विवाहित तरुणाला प्रेमजाळ्यात अडकवून लाखो रुपयांनी फसविल्याची तक्रार शनिवारी फे्रजरपुरा पोलिसात नोंदविली गेली. पहिल्यांदाच अशाप्रकारची आगळी तक्रार पोलिसात दाखल झाल्याने कुतूहलाचा विषय बनला होता. नंदूरबार येथील त्या तरुणीविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.प्रशांतनगर परिसरातील रहिवासी सागर गाडे (३०) डीजे साऊंड सिस्टीमचा ...

ठळक मुद्देनंदूरबारच्या तरुणीची करामतफे्रजरपुरा पोलिसात फसवणुकीची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मॉडेलसारख्या राहणाऱ्या एका तरुणीने विवाहित तरुणाला प्रेमजाळ्यात अडकवून लाखो रुपयांनी फसविल्याची तक्रार शनिवारी फे्रजरपुरा पोलिसात नोंदविली गेली. पहिल्यांदाच अशाप्रकारची आगळी तक्रार पोलिसात दाखल झाल्याने कुतूहलाचा विषय बनला होता. नंदूरबार येथील त्या तरुणीविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.प्रशांतनगर परिसरातील रहिवासी सागर गाडे (३०) डीजे साऊंड सिस्टीमचा व्यवसाय करीत होता. विवाहानंतर त्याला दोन मुली झाल्या आणि पती-पत्नीत खटके उडू लागले. दरम्यान सागरच्या मुंबई येथील मावस भावाने मॉडर्न व स्टॅन्डर्ड राहणीमान असलेल्या एका मुलीला घरी आणले. मुंबईत फार्मचे प्रशिक्षण घेताना त्या तरुणीची सागरच्या मावसभावासोबत ओळख झाली. त्याने तिला सागरच्या घरी आणले. सागरचा स्वभाव, कामकाज व पती-पत्नीचे वाद पाहून त्या तरुणीने सागरला आधार दिला. स्टॅडर्ड मेन्टेन करणाºया त्या तरुणीने सुंदर कपडे परिधान करून सागरला मोहित करण्याचा प्रयत्न केला. पती-पत्नीच्या वादाचा गैरफायदा घेऊन सागरशी जवळीक साधली. सागर पत्नीला सोडणार असल्याचे त्या तरुणीला कळले. त्यामुळे आता दोघेही एकमेकांसोबत प्रेमीयुगुलांसारखे राहू लागले. दोघेही हॉटेलिंग करायचे, वॉटर लॅन्डमध्ये मौजमस्ती करायला गेले. गार्डनमध्ये फिरून प्रेममिलाप करायला लागले.सर्वस्व लावले पणालादोघांमध्ये लैंगिक संबंध प्रस्थापित झाले. तिच्यावर वारेमाप खर्चसुद्धा करू लागला. त्या तरुणीने सागरला मेडिकल टाकण्याचा सल्ला दिला. त्याने डीजेचे साहित्य विकून आठ लाख मिळविले. ते पैसे त्या तरुणीनेच ठेवून घेतले. सागरने तिला लॅपटॉप, दोन मोबाईलसुद्धा घेऊन दिले. त्यासाठी त्याने त्याची चारचाकी व दुचाकीसुद्धा विकली. सागर ती म्हणेल, तेच करू लागला. तिने सागरला न सोडण्याबाबत स्टॅम्प पेपरवर लिहून दिले होते. मात्र, नोव्हेंबर २०१७ मध्ये ती तरुणी अचानक सागरला सोडून गेली. सागरने तिच्या मोबाईलवर संपर्क साधला. काय झाले, माझे काही चुकले का, माझ्यासोबत असे का केले, अशी विचारणा केली. मात्र, तिचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वारंवार तिच्या मोबाईलवर संपर्क सुरु ठेवले. माझे पैसे तरी परत दे, असे तिला म्हटले. त्यानंतर त्या तरुणीने नंदूरबार येथील धडगाव पोलीस ठाण्यात सागरविरुद्ध विनयभंगाची तक्रार नोंदविली. पोलिसांनी सागरला अटक केली. महिनाभर सागर कारागृहात होता. तेथून तो अमरावतीत परतला. काय करावे या विवंचनेत तो होता. ती तरुणी अनेकांना फसवित असावी, अशी शंका सागरला आाली. त्यामुळे त्याने शनिवार, २६ मे रोजी फे्रजरपुरा ठाण्यात त्या तरुणीविरुद्ध तक्रार नोंदविली.तरुणीने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणाला लाखो रुपयांनी गंडविल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यानुसार नंदूरबार येथील तरुणीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.- आसाराम चोरमले,पोलीस निरीक्षक, फे्रजरपुरा पोलीस ठाणे