शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीचे निर्देश

By admin | Updated: May 29, 2014 23:32 IST

अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची घोषणा दि. २0 मे रोजी आयोगाने केली व त्या दिवसांपासून विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याचे विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड यांनी स्पष्ट केले.

अमरावती : अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची घोषणा दि. २0 मे रोजी आयोगाने केली व त्या दिवसांपासून विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याचे विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड यांनी स्पष्ट केले. काही मुख्य कार्यपालन अधिकार्‍यांनी याविषयी विचारणा केली असता आयुक्तांनी आयोगाद्वारा २१ मे रोजी प्राप्त झालेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश विभागातील जि. प.  मुख्य कार्यपालन अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, उपायुक्त नगरपालिका प्रशासन व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी यांना दिले आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा २0 मे रोजी झाली; अधिसूचना २७ मे रोजी जारी झाली. २0 जून रोजी मतदान व २४ जूनला मतमोजणी होत आहे. निवडणूक घोषित झाल्याच्या दिनांकापासून विभागात आचारसंहिता लागू झाली आहे. आयोगाच्या सूचनेनुसार ज्या बैठकीमध्ये शिक्षण संस्था व शिक्षकांविषयी चर्चा ठेवली असेल अशा कार्यक्रमात राज्याचे मंत्री, इतर राजकीय व्यक्तींनी बोलाविलेल्या बैठकीत निवडणूक कार्यालयाशी संबंधित व्यक्तीने उपस्थित राहू नये.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निधीमधून किंवा शासनाच्या निधीतून शिक्षण संस्था व शिक्षक यांच्याशी संबंधित विषयाचे किंवा कामाचे धोरणात्मक निर्णय करण्यात येऊ नये तसेच या विषयाशी संबंधित कामांना या कालावधीत मान्यता देऊ नयेत किंवा कामांचा शुभारंभ करण्यात येऊ नये. मतदारावर प्रभाव पडेल अशी कोणतीही कृती करण्यात येऊ नये असे आयुक्तांनी बजावले आहे. (प्रतिनिधी)