शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट कुत्र्यांना आवर; निर्बिजीकरणाला वेग

By admin | Updated: November 8, 2016 00:08 IST

शहरात मोकाट कुत्र्यांचा वाढता हैदोस ही सामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे.

आयुक्तांचे निर्देश : पशूशल्य विभाग लागला कामाला अमरावती : शहरात मोकाट कुत्र्यांचा वाढता हैदोस ही सामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. या पार्श्वभूमिवर महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार यांनी सोमवारी पशूशल्य चिकित्सक विभागाची बैठक घेतली आणि मनपाद्वारे राबविण्यात येणाऱ्या श्वान निर्बिजीकरण आणि लसीकरण कार्यक्रमासाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आल्याचे या बैठकीत सांगितले. ७ नोव्हेंबरपर्यंत ४७८८ श्वानांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये २००१ नर तर २७८७ इतक्या मादी आहेत. नर श्वानांचे प्रमाण ४२ टक्के करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आलेत. मादी श्वानांचे अधिकाधिक निर्बिजीकरण व लसीकरण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी यावेळी केल्यात. या कार्यक्रमात आतापर्यंत ३७ लाख रूपये खर्च करण्यात आले आहेत. याकरिता एजन्सीची नियुक्ती करण्यात आली होती. त्यापैकी एका एजन्सीचे काम सुरु झाले आहे. तर दुसऱ्या एजन्सीसाठी त्वरित जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्याला महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. उर्वरित खर्चात राहिलेल्या श्वानांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण करण्याचे धोरण ठरविण्याचे सक्त निर्देश आयुक्तांनी यावेळी दिलेत. महानगरपालिकेतर्फे जानेवारी २०१५ ते डिसेंबर २०१५ पर्यंत ५६३ मोकाट जनावरे पकडण्यात आली असून २,७१,००० रूपये इतका दंड वसूल करण्यात आला. जानेवारी २०१६ ते आॅक्टोबर २०१६ पर्यंत ७३३ मोकाट जनावरे पकडून त्यांच्या मालकांकडून २,७३,००० ेइतका दंड वसूल करण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांनी मोकाट जनावरे पकडण्याची कार्यवाही अधिक वेगाने करावी, असे निर्देश पशूशल्य विभागाला दिले आहेत. या मोहिमेमेमुळे शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर अंकुश बसणार आहे. (प्रतिनिधी)महापालिका आयुक्तांच्या दिशानिर्देशाने मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम अधिक वेगाने राबविली जाईल. मोकाट कुत्र्यांवर अंकुश राखला जाईल. - सुधीर गावंडे, पशू शल्यचिकित्सक, महापालिका