लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उघड्या घरात शिरून मोबाइल चोरून नेणाऱ्या आरोपीला गजाआड करण्यात सायबर ठाण्याच्या पोलिसांना मंगळवारी यश मिळाले. प्रशिक भगवान वानखेडे (२२, रा. राधिकानगर) असे आरोपीचे नाव असून, त्याच्या घरातून पोलिसांनी तब्बल तीन लाखांचे २९ मोबाइल हँडसेट जप्त केले आहेत.चपराशीपुºयात एक इसम मोबाइल विकत असल्याची गोपनीय माहिती सायबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या इसमाची चौकशी करून अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ दोन मोबाइल मिळाले. त्या इसमाला ताब्यात घेतल्यानंतर त्याने स्वत:चे नाव प्रशिक वानखेडे असे सांगितले. पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ४१(१)(४) प्रमाणे प्रशिकला अटक केली. त्याच्याजवळून जप्त महागडा मोबाइल हा गाडगेनगर हद्दीतून चोरीस गेल्याचे आढळून आले. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर करून ५ जुलैपर्यंत कोठडी मिळविली. चौकशीनंतर पोलिसांनी प्रशिकच्या घराची झडती घेतली. त्याच्या घरातून २९ मोबाइल जप्त केले. आरोपी हा उघड्या घरात शिरून संबंधित कुटुंबीयांची नजर चुकवून मोबाइल चोरी करीत असल्याचे निदर्शनास आले. प्रशिकने सर्वाधिक मोबाइल गाडगेनगर हद्दीतून चोरल्याची कबुली दिली. येथील विद्यार्थ्यांच्या खोल्या प्रशिकने लक्ष्य केल्या होत्या. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या मार्गदर्शनात सायबरचे पोलीस निरीक्षक अनिल कुरळकर, सहायक पोलीस निरीक्षक कांचन पांडे, पोलीस उपनिरीक्षक ईश्वर वर्गे, पोलीस हवालदार जगदीश पाटील, पोलीस शिपाई दीपक बदरके, ताहेर अली, सचीन भोयर, गोपाल सोळंके, सुधीर चर्जन, पंकज गाडे, मयूर बोरेकर, चालक जाकीर खान यांनी ही कारवाई केली.
उघड्या घरातून मोबाईल चोरणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 22:55 IST
उघड्या घरात शिरून मोबाइल चोरून नेणाऱ्या आरोपीला गजाआड करण्यात सायबर ठाण्याच्या पोलिसांना मंगळवारी यश मिळाले. प्रशिक भगवान वानखेडे (२२, रा. राधिकानगर) असे आरोपीचे नाव असून, त्याच्या घरातून पोलिसांनी तब्बल तीन लाखांचे २९ मोबाइल हँडसेट जप्त केले आहेत.
उघड्या घरातून मोबाईल चोरणारा अटकेत
ठळक मुद्दे३० हँडसेट जप्त : सायबर पोलिसांची धडाकेबाज कारवाई