शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

सिंधी चौकातून मोबाईल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:23 IST

अमरावती : घरी झोपण्यास गेलेल्या युवकाने १० हजारांचा मोबाईल चोरून नेल्याची घटना गाडगेनगर ठाण्यांतर्गत रामलक्ष्मण संकुल सिंधी चौक येथे ...

अमरावती : घरी झोपण्यास गेलेल्या युवकाने १० हजारांचा मोबाईल चोरून नेल्याची घटना गाडगेनगर ठाण्यांतर्गत रामलक्ष्मण संकुल सिंधी चौक येथे २ डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी गुन्हा पोलिसांनी मंगळवारी नोंदविला. फुलचंद सूरज येवणे ( रा. सर्की जि. बैतुल मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी अमन नईन देशमुख (२५, रा. वडगाव यवतमाळ, ह. म. सिंधी चौक) यांनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. फिर्यादीचा मित्र मंगेश नाईक याने फुलचंदला फिर्यादीच्या घरी झोपण्याकरिता पाठविले असता, त्याने मोबाईल चोरून नेला.

---------------------------------------------

यशोदानगर येथे जुगार पकडला

अमरावती : फ्रेजरपुरा पोलिसांनी येथील यशोदानगरात जुगार अड्ड्यावर धाड टाकून जुगार साहित्यासह १,०२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. अनिनाश अशोक पारडे (२६, रा. बेलपुरा) असे आरोपीचे नाव आहे.

-----------------------------------------

कुंभारवाडा येथे दारू पकडली

अमरावती : फ्रेजरपुरा पोलिसांनी येथील कुंभारवाड्यात कारवाई करून १,१०० रुपये किमतीची अवैध दारू जप्त केली. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. आरोपी हुसेन रहेमान रायलीवाले (५२, रा. कुंभारवाडा)विरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

-----------------------------------------

लक्ष्मीनगरातून दारू जप्त

अमरावती : गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीनगर येथे पोलिसांनी मंगळवारी धाड टाकून १०८० रुपयांची अवैध दारू जप्त केली. याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.पुढील तपास पोलीस करीत आहे.

--------------------------------

इर्विन रुग्णालयात महिलेचा मृत्यू

अमरावती : एका ३८ महिलेला इर्विन रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी बडनेरा पोलसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

---------------------

अंबा कॉलनीत इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

अमरावती : अंबा कॉलनीत राहणाऱ्या व एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. परमेश्वर संपतराव नागले (४७, रा. अंबा कॉलनी) असे मृताचे नाव आहे. त्यांनी राहत्या घरी १० फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

--------------------------------------