शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिधापत्रिकेवर आमदार कडूंचा शिक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 22:25 IST

स्थानिक तहसील कार्यालयामार्फत ‘आमदाराची राहुटी आपल्या गावात २०१८’ या अभियानांतर्गत घेतलेल्या शिबिरांमधून १८०० शिधापत्रिकांवर आ. बच्चू कडू यांच्या नावाचे शिक्के मारून शिधापत्रिका वितरित करण्यात आल्या होत्या. सदर शिधापत्रिकेवर बेकायदेशीर शिक्के मारणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्याकडे केली. त्यांनी याप्रकरणी उपोषणाचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देपुरवठामंत्र्यांकडे तक्रार : नगरसेवकाने केली कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : स्थानिक तहसील कार्यालयामार्फत ‘आमदाराची राहुटी आपल्या गावात २०१८’ या अभियानांतर्गत घेतलेल्या शिबिरांमधून १८०० शिधापत्रिकांवर आ. बच्चू कडू यांच्या नावाचे शिक्के मारून शिधापत्रिका वितरित करण्यात आल्या होत्या. सदर शिधापत्रिकेवर बेकायदेशीर शिक्के मारणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्याकडे केली. त्यांनी याप्रकरणी उपोषणाचा इशारा दिला आहे.शासनाच्या विविध योजनांचा लाभ व माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने राहुटी अभियानांतर्गत १ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान गावागावांत शिबिर पार पडले. दस्तावेज तपासून १८०० लाभार्थींना शिधापत्रिका देण्यात आल्या. मात्र, या शिधापत्रिकेवर ‘आमदार बच्चू कडू आमदाराची राहुटी आपल्या गावात २०१८’ असे शिक्के मारण्यात आल्याचा आरोप नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी केला आहे. याबाबत नगरसेवक तिरमारे यांनी १५ जून व ७ जुलै रोजी तहसीलदार शिल्पा बोबडे यांना पत्राद्वारे शिधापत्रिकेवर आमदारांचे शिक्के कोणत्या अधिकाºयांच्या आदेशाने व कुठल्या शासननिर्णयाने मारण्यात आले, याबाबत चौकशीची मागणी केली होती.तहसीलदार बोबडे यांनी यासंदर्भात सदर शिक्के अधिकाºयांच्या संमतीने मारले नसल्याचे सांगितले तसेच कागदपत्रे पडताळणीनंतर निरीक्षण अधिकारी, अचलपूर यांच्या स्वाक्षरीने रेशन कार्ड वितरित केल्याचे त्यांनी आपल्या चौकशीदरम्यान सांगितले. त्यानंतर नगरसेवक तिरमारे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्यापुढे हे प्रकरण दाखल केले.ना. बापट यांनी याप्रकरणी संबंधित विभागाच्या उपसचिवांंना आदेश दिले आहेत.चुकीचे काय?सदर शिधापत्रिका विशिष्ट जात, धर्म तसेच पक्षाच्या लाभार्थींना वितरित करण्यात आल्या नसल्याने यात चुकीचे काय, असा खडा सवाल लाभार्थींतर्फे उपस्थित केला जात आहे.उपोषणाचा इशाराशिधापत्रिकेवर नियमानुसार संबंधित अधिकाऱ्यांचा शिक्का असतो. कोणत्याही खाजगी व्यक्तींचा शिका किंवा नाव त्यावर नमूद करता येत नाही. याप्रकरणी दोषींवर कारवाई न झाल्यास येत्या २ आॅक्टोबरला बेमुदत उपोषण करण्याचा इशारा तिरमारे यांनी दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नगरसेवक तिरमारे व आ. कडू यांच्यातील राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.