शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
3
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
4
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
5
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
6
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
7
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती
8
Video - स्टंटगिरी! हिरो बनण्याच्या नादात मर्सिडीज थेट समुद्रात नेली, दलदलीत अडकली अन्..
9
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
10
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
11
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
12
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
13
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
14
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
15
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
16
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
17
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
18
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
19
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
20
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया

आमदारांनी केली वसतिगृहाची पोलखोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 22:05 IST

स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी मंगळवारी युवक काँग्रेसच्यावतीने समाजकल्याण उपायुक्तांना निवेदन देण्यात आले. निवेदन दिल्याच्या तासाभरातच समाजकल्याण उपायुक्तांनी वसतिगृहाला भेट दिली.

ठळक मुद्देयुवक काँग्रेसचे आंदोलन : वॉर्डनची मुलींना अश्लील शिवीगाळ

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी मंगळवारी युवक काँग्रेसच्यावतीने समाजकल्याण उपायुक्तांना निवेदन देण्यात आले. निवेदन दिल्याच्या तासाभरातच समाजकल्याण उपायुक्तांनी वसतिगृहाला भेट दिली. यावेळी उपायुक्तांसमोरच आ. वीरेंद्र जगताप यांनी विद्यार्थ्यांना विचारपूस केली असता, अनेक बाबी उघड झाल्या.आ. वीरेंद्र जगताप व मंगला मून यांनी मंगळवारी सकाळी ७.३० वाजता वसतिगृहाला भेट देऊन मुलींची विचारपूस केली. दरम्यान धक्कादायक बाबी पुढे आल्या. यासंदर्भात युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी समाजकल्याण उपायुक्त मंगला मून यांना निवेदन दिले. वसतिगृहातील अनास्था, जेवण्यात अळ्या, दुपारचे जेवण शाळेच्या अवेळी, टाकीत दूषित पाणी, ती टाकी वर्षातून दोनदा धुतली जाते. शिळे अन्न दिले जाते. आरोग्यविषयी कुठलीही सुविधा नाही. मासिक भत्ता ६०० रुपये कधीच वेळेवर मिळत नाही. वॉर्डन अश्लील शिवीगाळ करतात. मुलींच्या रूमची, बाथरूमची सफाई त्यांच्याकडूनच करवून घेतली जाते आदी बाबी निवेदनात नमूद आहेत. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष परीक्षित जगताप, पंकज मोरे, संदीप शेंडे, मोहम्मद शहजाद सौदागर, सागर यादव, नीलेश गुहे, सुमेध सरदार, राजू लांजेवार, सुजित माकोडे, सौरभ ईटके आदी उपस्थित होते.निवेदन दिल्याच्या काही तासांतच समाजकल्याण उपायुक्त मंगला मून यांनी स्थानिक मुलींच्या वसतिगृहाला भेट दिली. यानंतर आ. जगतापसुद्धा वसतिगृहात आले होते. आ. जगताप यांनी उपायुक्तांसमोरच वसतिगृहातील मुलींना समस्येबाबत विचारणा केली.