शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात कुपोषणमुक्तीसाठी ‘मिशन २८’ ठरले प्रभावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 05:00 IST

मोहिमेदरम्यान उपचारांबरोबरच समुपदेशन व जनजागृती हा घटक महत्त्वपूर्ण ठरला. कमी वजन असलेल्या एका बालकाला रुग्णालयात संदर्भित करण्याबाबत त्याचे कुटुंबीय तयार नव्हते; पण आरोग्य पथकांनी केलेल्या प्रभावी समुपदेशनाने कुटुंबीयांचे मन वळविण्यात यश मिळाले. त्या बालकास भरती करण्यात आले व उपचारानंतर त्याचे वजन वाढून प्रकृती सुखरूप आहे. एका मातेच्या अंगावर सूज व लघवीत प्रोटीन आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाटात कुपोषणमुक्ती व आरोग्य जनजागृतीच्या दृष्टीने जिल्हा ग्रामीण आरोग्य यंत्रणेने महिला व बालविकास विभागाच्या समन्वयातून राबवलेले ‘मिशन २८’ प्रभावी ठरले आहे.मेळघाटात कुपोषणमुक्तीसाठी सातत्यपूर्ण मोहीम राबविण्याचे निर्देश महिला व बालविकासमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले होते. त्यानुसार मेळघाटात पाड्यापाड्यांवर अधिकारी व कर्मचारी यांच्या गृहभेटी, आवश्यक उपचार, सल्ला व पाठपुरावा याद्वारे २८ दिवस मोहीम राबविण्यात आली.  मोहिमेदरम्यान उपचारांबरोबरच समुपदेशन व जनजागृती हा घटक महत्त्वपूर्ण ठरला. कमी वजन असलेल्या एका बालकाला रुग्णालयात संदर्भित करण्याबाबत त्याचे कुटुंबीय तयार नव्हते; पण आरोग्य पथकांनी केलेल्या प्रभावी समुपदेशनाने कुटुंबीयांचे मन वळविण्यात यश मिळाले. त्या बालकास भरती करण्यात आले व उपचारानंतर त्याचे वजन वाढून प्रकृती सुखरूप आहे. एका मातेच्या अंगावर सूज व लघवीत प्रोटीन आढळून आले. तिला वेळीच उपचार मिळाल्याने ती सुखरूप आहे. या मोहिमेत आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, भरारी पथक, समुदाय अधिकारी, आरोग्यसेविका, आशासेविका, अंगणवाडी सेविका यांच्या पाड्यापाड्यांवर भेटी वाढल्याने प्रभावी जनजागृती व पाठपुरावा झाला. माता व बालकाचे धोके व जोखीम ओळखून आजाराचे निदान लवकरात लवकर करण्यात यश आले.जे नवजात बालक कमी वजन, हायपोग्लासेमिया, हायपोथर्मिया, अतिसार, तीव्र जंतुसंसर्ग, न्यूमोनिया, नवजात बालकांना होणारा कावीळ आदींमुळे ग्रस्त होते, त्यांना वेळेत उपचार मिळवून देण्यात आला. माता व बालकाचे निरंतर निरीक्षण, पाठपुरावा व तपासणी २८ दिवसांपर्यंत करण्यात आली. मोहिमेत प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या गृहभेटींची छायाचित्रांसह नोंद ठेवली. त्यामुळे मोहिमेत ही व्यापक प्रक्रिया परिपूर्णपणे राबविण्यात यश मिळाले.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर