शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

रेल्वे, बसस्थानकांवरील महिला प्रवासी मदत केंद्र बेपत्ता

By admin | Updated: July 20, 2016 00:13 IST

मध्यवत्ती बसस्थापनाला रेल्वे स्टेशनवर महिला प्रवासी मदत केंद्र स्थापन करण्याच्या सूचनेला वाहतूक शाखेने पुरुष व महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, ...

सुरक्षा वाऱ्यावर : पोलीस आयुक्तांच्या पत्राला केराची टोपलीअमरावती : मध्यवत्ती बसस्थापनाला रेल्वे स्टेशनवर महिला प्रवासी मदत केंद्र स्थापन करण्याच्या सूचनेला वाहतूक शाखेने पुरुष व महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, अशा सूचना पोलीस आयुक्तांनी वाहतूक पोलीस निरीक्षकांना दिल्या होत्या. तथापि सहा महिने उलटून गेल्यावरही या सूचनांची अंमलबजावणी झालेली नाही.पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी बसस्थानकाच्या सुरक्षेसंबंधी घ्यावयाची दक्षता व करावयाची उपाययोजना याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. राज्य महामंडळाची बसस्थानके ही सार्वजनिक ठिकाणे असल्याने अतिरेक्यांची सॉफ्ट टार्गेट ठरू शकतात. आतंकवाद्यांमार्फत बॉम्बस्फोट व अन्य घातपाताच्या घटना घडवून आणल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते. त्या अनुषंगाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आगार स्थानकाच्या ठिकाणी उपाययोजना राबविण्याच्या उद्देशाने आयुक्तांनी निर्देश दिले होते. राजापेठ वाहतूक निरिक्षकांनी फैजरपुरा व गाडगेनगर यांचे समवेत बसस्थापनाची पाहणी करावी. सुचतांची पूर्तता करून तीन दिवसांत अहवाल द्यावा, असे सुचविण्यात आले. प्रत्यक्षात हा अहवाल कुणाकडे आहे, हे प्रश्नही अनुत्तरित आहे.सूचनांची अंमलबजावणी नाहीचप्रवाशांची वाहने, प्रवाशास सोडणाऱ्या, घ्यावयास येणाऱ्या नातेवाईकांच्या वाहनांच्या पार्किंगचे व्यवस्थित नियोजन करावे, सदर नियोजन हे आगार व्यवस्थापक यांच्यासोबत चर्चा करून जागा उपलब्ध करून व्यवस्थित करून घ्यावी, बसस्थानकासह रेल्वे स्थानकावरही महिला प्रवासी केंद्र सुरू करण्यात यावे, तेथे वाहतूक पोलिसांची नियमित नेमणूक करावी, रिक्षा चालक हे प्रवाशांकडून वाजवी भाडे घेतील. प्रवाशांना भाडे नाकारणाऱ्यांशी याबाबत कर्तव्यावर असलेल्या वाहतूक कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी, बसस्थानक परिसरात येणाऱ्या रिक्षा व्यवस्थित एका लाईनमध्ये उभ्या राहतील व वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, अशा सूचना होत्या. प्रत्यक्षात या सूचनांची अंमलबजावणी कधीही झाली नाही.यासंदर्भात तत्कालीन प्रभारी सहायक आयुक्त बळीराम डाखोरे यांनी अंमलबजावणीस सुरुवात केली होती. तत्कालीन वाहतूक निरीक्षक प्रमेश आत्राम यांनीही सूचना दिल्या होत्या. मात्र त्यांच्या जागी आलेले नवे निरीक्षक या सूचनांपासून अनभिज्ञ आहेत. बसस्थानक परिसरात कार्यरत असलेले वाहतूक पोलीस बसस्थानकाच्या आत जाऊन पाहण्याचे औदार्य दाखवीत नाहीत. यासंबंधी सूचना देणे आवश्यक आहे.कुठे गेलेत एटीचे सुरक्षारक्षक ?सुमारे चार महिन्यांपूर्वी गाजावाजा करीत मध्यवर्ती बसस्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वारासमोर सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले, हे सुरक्षारक्षक कुठलीही दुचाकी वा अन्य खासगी वाहने आगारात जाऊ देत नव्हते. मात्र आता ते सुरक्षारक्षकच बेपत्ता झाल्याने दुचाकी पार्किंग शेवटच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचली. रसवंतीच्या बाजूने ५० पेक्षा अधिक दुचाकी पार्क केल्या जातात. सुरक्षारक्षक नसल्याने येथून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाणे वाढले आहे.