शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गौण खनिज तस्करांमध्ये धास्ती

By admin | Updated: March 13, 2016 00:11 IST

येथे नव्यानेच रुजू झालेले तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी लाखो रुपयांचे गौण खनिजाची चोरी करणाऱ्यांविरोधात धाडसत्र राबवून दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.

महसूलची कारवाई : ८ महिन्यांत १२ लाख रुपयांचा दंड वसूल, धास्तीवरुड : येथे नव्यानेच रुजू झालेले तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी लाखो रुपयांचे गौण खनिजाची चोरी करणाऱ्यांविरोधात धाडसत्र राबवून दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. याला आळा घालण्यासाठी धडक मोहीम उभारून रात्री बेरात्री धाडसत्र राबविणे सुरू केले. यामध्ये आठ महिन्यात रेती, गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या ४९ वाहनांवर कारवाई करून १२ लाख १५ हजार २७ रुपयांची दंडाची रक्कम शासन तिजोरीत जमा झाली.तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे, या उद्देशाने आपले कार्य सुरू केले. १४ आॅगस्ट २०१५ रोजी वरुडच्या तहसीलदार पदाची सूत्रे स्वीकारली. त्यांना तालुक्यात अवैध वृक्षतोड आणि गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याचे लक्षात आले. एका फिरत्या पथकाची नेमणूक करून अवैध गौण खनिज आणि वृक्षतोडीवर अंकुश लावण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आठ महिन्यात रेती, गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या ४९ वाहनांवर कारवाई करून १२ लाख १५ हजार २७ रुपये दंडाची रक्कम शासन तिजोरीत जमा झाली. अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणात एवढी रक्कम कधीही शासन महसुली जमा झाली नाही, हे विशेष. कारवाइने धास्तावलेले दगड, रेती, मुरूम वाहतुकीकरिता अधिकृत गौण खनिजाच्या वाहतुकीचे परवाने घेऊन वाहतूक करणाऱ्याकडूनसुध्दा रक्कम जमा झाली. सार्वजनिक कार्यालयात काम करताना सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे, हा उद्देश मनाशी ठेवून आपले कार्र्य सुरू आहे. कुणालाही एक छदामचाही गैरप्रकार करू दिले जात नाही. अवैध वृक्ष तोड असो की, गौण खनिज वाहतूक असो, वाहतूकदार कोणीही असला तरी मापदंड सर्वांकरिता सारखेच ठेवून कारवाई केली जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळत आहे. मात्र गौण खनिज आणि वृक्ष तोड करणारे धास्तावले आहे. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्यासाठी या दबंग तहसीलदारांचे नाव जरी घेतले तरी अवैध धंदे करणाऱ्यामध्ये थरकाप उडतो, हे सत्य आहे. परंतु हा थरकाप त्यांच्या प्रामाणिकतेचा असून यांच्या मदतीला जिल्हाधिकारी किरण गित्ते आणि उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांचीसुध्दा साथ मिळत असल्याने गौण खनिज चोरट्यांना वठणीवर आणण्याचे काम करता येते. रात्रीसुद्धा महसूल विभागातर्फे गस्त सुरू असून येथील रेतीमाफियांवर दंडात्मक कारवाईची मालिका सुरू आहे.(तालुका प्रतिनिधी)