शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
5
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
6
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
7
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
10
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
11
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
12
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
13
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
14
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
15
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
16
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
17
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
18
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
19
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
20
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

नांदगाव तालुक्यात गौण खनिजांची चोरी

By admin | Updated: January 11, 2015 22:43 IST

नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुरुम, दगड आणि गिट्टीच्या खदानी आहेत. परंतु खदाणीवरुन रोज शेकडो ट्रक गौण खनिज विनापरवाना खदानीवरुन घेऊन जात असल्याने शासनाला

मनीष कहाते - वाढोणा रामनाथनांदगाव खंडेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुरुम, दगड आणि गिट्टीच्या खदानी आहेत. परंतु खदाणीवरुन रोज शेकडो ट्रक गौण खनिज विनापरवाना खदानीवरुन घेऊन जात असल्याने शासनाला लाखो रुपयांचा चुना लावत आहे. याकडे तलाठी आणि मंडळ अधिकारी हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप जनतेने केला आहे. तालुक्यातील सर्वात मोठी गिट्टी खदान अमरावती - यवतमाळ महामार्गावर असलेल्या जळू, धानोरा जोग आणि टिमटाळा येथे आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून महसूल विभागाने वरील तीनही गिट्टीचे खदान एकाच व्यक्तीला चालविण्याकरिता दिले आहेत. त्यामुळे महसूल विभागाचे एकाच व्यक्तीवर एवढे प्रेम का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. खदानीवरुन रोज शेकडो ट्रक गिट्टी विनारायल्टी अथवा एकच रायल्टी पास संपूर्ण दिवसभर गिट्टी ट्रकधारक चालवीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे गिट्टीच्या माध्यमातून शासनाचा लाखों रुपयांचा महसूल बुडत आहे. यामध्ये मंडळ अधिकारी आणि संबंधित तलाठी सहभागी असल्याचे आहे. त्यामुळे राजरोसपणे वाहतूक सुरू असल्याचे नागरिक सांगतात. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कोठोडा, सालोड, शिवरा, फुबगाव, लोणी टाकळी, पिंपळगाव निपानी यासह छोट्या मोठ्या मुरुम आणि दगडाच्या खदानी बहुतांश गावांमध्ये आहेत. परंतु गौणखनिजाची एका ट्रकची परवानगी तहसील कार्यालयामधून ठेकेदार प्राप्त करतात आणि एका ट्रकच्या परवानगीवर कित्येक ट्रक जेसीबीच्या सहाय्याने भरुन वाहतूक करतात. हा प्रकार सर्रास सुरू आहे. परंतु प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यातील संपूर्ण महसूल यंत्रणा सज्ज असताना मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची दिवसाढवळ्या चोरी होत आहे. अवैध मार्गाने गौणखनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी तहसीलदार जातात तेव्हा तहसीलदार पोहचण्यापूर्वीच संबंधितांना फोन करुन माहिती देण्यात येते. यामध्ये काही महसूल विभागाचे कर्मचारी, तलाठीसुद्धा सहभागी असल्याची माहिती आहे. त्यामुळे चोरटे वाहने पकडायचे कसे आणि कारवाई करायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.