शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालयातून ‘पोस्टमार्टेम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 01:08 IST

प्रदीप भाकरे।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या श्वान निर्बीजीकरण शस्त्रक्रियेतील भ्रष्टाचाराचे पोस्टमार्टेम आता थेट मंत्रालयात होणार आहे. या शस्त्रक्रिया व एकंदर संपूर्ण प्रकरणाचा अहवाल राज्य शासनाने महापालिकेला मागितला आहे. महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी शशिकांत योगे यांनी महापालिका आयुक्तांनी याबाबत स्वयंस्पष्ट अहवाल द्यावा, अशी सूचना वजा पत्र १३ एप्रिलला ...

ठळक मुद्देशासनाने मागितला अहवाल : आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष

प्रदीप भाकरे।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या श्वान निर्बीजीकरण शस्त्रक्रियेतील भ्रष्टाचाराचे पोस्टमार्टेम आता थेट मंत्रालयात होणार आहे. या शस्त्रक्रिया व एकंदर संपूर्ण प्रकरणाचा अहवाल राज्य शासनाने महापालिकेला मागितला आहे. महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी शशिकांत योगे यांनी महापालिका आयुक्तांनी याबाबत स्वयंस्पष्ट अहवाल द्यावा, अशी सूचना वजा पत्र १३ एप्रिलला केली आहे.सन २०१८ च्या पहिल्या (अर्थसंकल्पीय) अधिवेशनामध्ये विचारण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेच्या अनुषंगाने श्वान निर्बीजीकरणासंदर्भात अहवाल मागविण्यात आला आहे. विधान परिषदेचे आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या लक्षवेधीवर २८ मार्च रोजी चर्चा झाली. त्यावर नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी बैठकीचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने विधिमंडळ सचिवालयाकडून प्राप्त झालेल्या कार्यवृत्ताचा संदर्भ देऊन योगे यांनी महापालिका आयुक्त पवार यांना आवश्यक कागदपत्रांसह स्वयंस्पष्ट अहवाल मागितला आहे. हा अहवाल दोन दिवसांत जरी मागण्यात आला असला तरी गुरुवारी सायंकाळपर्यंत तो पोहचवण्यात आला नसल्याची माहिती आहे. २०१६-१७ मध्ये अमरावती मनपा क्षेत्रात श्वानांवर निर्र्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आल्या.दडपविण्याचा घाटमहापालिकेचे धिंडवडे मंत्रालयात निघू नये म्हणून श्वान निर्बीजीकरणात सारे आलबेल असल्याचे मंत्रालयाला कळविण्यात येईल, अशी भीती व्यक्त होत आहे. मागे सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या अमृत संस्थेबद्दल चौकशी अहवालात अनियमिततेवर बोट ठेवण्यात आले होते. मात्र, आ. जोगेंद्र कवाडे यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर पाठवताना या प्रकरणात कुठलीही अनियमितता झाली नसल्याचे प्रशासनाने कळविले होते. श्वान निर्बीजीकरण प्रकरणातही कातडी वाचविण्याचा प्रकार होईल, अशी साशंक भीती आहे.अनियमिततेवर शिक्कामोर्तबश्वान निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केवळ कागदावर करण्यात आल्या व त्यात लाखो रुपयांची अनियमितता झाल्याचा अहवाल यापूर्वीच प्रशासनाला मिळाला आहे. एका दिवशी १५ ते २० श्वानांवर शस्त्रक्रिया अपेक्षित असताना, तब्बल १०० शस्त्रक्रिया दाखविण्यात आल्या. याचा अर्थ, त्या कागदावरच दाखवून रक्कम लाटण्यात आली. त्या अनुषंगाने आ. देशपांडे यांनी विचारलेले प्रश्न आणि योगेंनी मागितलेल्या अहवालाचे उत्तर महापालिकेकडे तयारच आहे. मात्र, यातील अनियमितता दाखविली जाते की दडविली जाते, हा प्रश्नच आहे.